Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Health Department

पावसाळ्यात साथरोग रोखण्यासाठी दक्षता घ्या; ग्रामपंचायतींमध्ये TCL पावडर उपलब्ध ठेवा : सीईओ विवेक गायकवाड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात.


पावसाळ्यात साथरोग रोखण्यासाठी दक्षता घ्या ग्रामपंचायतींमध्ये tcl पावडर उपलब्ध ठेवा  सीईओ विवेक गायकवाड

Health Department |

हिंगोली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात टीसीएल (TCL) पावडर उपलब्ध ठेवावी तसेच पाण्याचे नमुने नियमितपणे तपासणीसाठी पाठवावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक झाली. यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजना व कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डूडुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवाडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अभिजित बांगर, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. संदीप काळे, डॉ. नारायण शिंदे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. प्रशांत पुठावार, समूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, डीपीएचएन मनिषा वडकुते, शीतल मानतकर, संदीप मुरकर, मुनाफ शेख, विजय भालेराव, विजय पाठक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दूषित आढळलेल्या पाणीस्त्रोतांचे तातडीने शुद्धीकरण करून त्यानंतर फेरतपासणीसाठी पाण्याचे नमुने पाठविण्यात यावेत. पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेऊन साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, अशा सूचनाही विवेक गायकवाड यांनी दिल्या.

बैठकीत टीबी मुक्त भारत अभियान, राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम, प्रेरणा प्रकल्पांतर्गत मनशक्ती क्लिनिक, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, पॅलिएटिव्ह केअर, गरोदर मातांची नोंदणी व तपासणी, बाल आरोग्य, रुग्ण कल्याण समिती, सिकलसेल आजार नियंत्रण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, संस्थात्मक प्रसूती, आयुष, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS), कुटुंब कल्याण शिबिर तसेच IPHS आदी कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेताना अवैध लिंगनिदानास प्रतिबंध करण्यासाठी स्ट्रिंग ऑपरेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आवश्यक जनजागृती करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

माता व बाल संगोपन कार्यक्रमाचा आढावा घेताना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करून कुटुंब कल्याण स्त्रीशस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर भर देताना गरज नसताना प्रसूतीसाठी रुग्णांना इतरत्र संदर्भित करू नये, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

नागरिकांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी NQAS मानांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असेही विवेक गायकवाड यांनी सांगितले.

राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग तपासणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे आवश्यक आजारांसाठी स्क्रीनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरबीएसके (RBSK) पथकांमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मोठ्या शाळांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व स्क्रीनिंग पूर्ण करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका सुस्थितीत असून त्या तातडीच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, याची संबंधितांनी खात्री करावी. रुग्णवाहिकांमध्ये पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध ठेवावे, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

या बैठकीस तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Related to this topic: