Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हट्टा जिल्हा परिषद शाळा

हट्टा येथील शाळेत शिक्षकांच्या मागणीवरून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भरवली शाळा

Hatta Zilla Parishad School: वसमत तालुक्यातील हट्टा येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन


हट्टा येथील शाळेत शिक्षकांच्या मागणीवरून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भरवली शाळा

Hatta Zilla Parishad School |

 

विद्यार्थ्यांच्या आदोलनानंतर शिक्षकाची नियुक्ती

हट्टा (Hatta Zilla Parishad School) : वसमत तालुक्यातील हट्टा येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी ४ ऑगस्ट मंगळवार रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात शाळा भरवून आंदोलन केले. आम्हाला शिक्षक द्या, शिक्षक द्या अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. धडक मोर्चा नंतर शिक्षण विभागाने रिक्त पदावर नियुत्तäया केल्या असून एका शिपायाची देखील पदस्थापना केली आहे.

पी.एम. श्री. जि. प. प्रशाळेत येथे सध्या राजपत्रित मुख्याध्यापक, इंग्रजी विषय शिक्षक, विज्ञान विषय शिक्षक आणि शिपाई ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन ठप्प झाले आहे. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान आणि इंग्रजीचे वर्ग होत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची आठवण करून देत आंदोलकांनी सांगितले की, शिक्षणाधिकार्‍यांनी १० जुलै रोजी लेखी दिले होते की,  विज्ञान विषयाचे शिक्षक  पी. एन. देशपांडे यांची तात्काळ बदली करण्यात येईल. राजपत्रित मुख्याध्यापक, एक इंग्रजी आणि एक विज्ञान शिक्षक यांची तात्काळ नियुक्ती होईल. हिंगोलीत कार्यरत असलेला परंतु हट्टा शाळेत कागदोपत्री नियुक्त असलेला शिपाई तात्काळ रुजू करून घेण्यात येईल.  सर्व मागण्या २० जुलैपर्यंत पूर्ण होतील, असेही आश्वासन दिले होते.

देशपांडे यांची बदली झाली असून त्याबद्दल आभार मानत, उर्वरित ४ पदे मात्र आजपर्यंत भरली गेली नाहीत, अशी खंत व्यक्त केली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची मुदत ३ ऑगस्टला संपली. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मंगळवारी शाळा भरो' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी बसून निषेध नोंदवला. दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवार रोजी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला.मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर तीव्र दबाव निर्माण झाला.आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या.

शिक्षण विभागाने सर्व रिक्त शिक्षक पदांवर नियुत्तäया करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शाळेसाठी एका शिपायाचीही पदस्थापना करण्यात आली. आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने शिक्षणाधिकारी असावरी काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तातेराव खाडे, यशवंत खाडे, गंगाधर माटे, रामकिशन खाडे,  रवि खाडे, नितीन खाडे आदी गावकरी उपस्थित होते. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टीने पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता.

अनेकांची उडाली धांदल
हट्टा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद शाळेमध्ये दहावीच्या वर्गासाठी इंग्रजी विषयाचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदमध्ये येऊन शिक्षणाधिकारी असावरी काळे यांना घेरावा घातला. यावेळी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्याने काहीजणांची एकच तारांबळ उडाली होती.