Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक; उद्या जिल्हाभर निदर्शने

Harsh Vardhan Sapkal: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ


हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक उद्या जिल्हाभर निदर्शने

Harsh Vardhan Sapkal |


शेतकरी प्रश्नांवरून सुरू झालेल्या सभेत राजकीय वातावरण तापले

चिखली (Harsh Vardhan Sapkal) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, भारतीय जनता पक्षाने या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने बुलढाणा जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात भाजपातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा अयोग्य असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी बोलताना राजकीय मर्यादा आणि सभ्यता पाळली जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काँग्रेस पक्षाने या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, भाजपाच्या वतीने दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील विविध मंडळ स्तरांवर स्थानिक काँग्रेस कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या (Harsh Vardhan Sapkal) प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आगामी काळात या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.