Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Gutkha Seizure

उदगीरमध्ये स्कुटीच्या डिकीतून ५० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांविरोधात कारवाई करत सुमारे ५० हजार ९२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला


उदगीरमध्ये स्कुटीच्या डिकीतून ५० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Gutkha Seizure |

उदगीर (Gutkha Seizure) : उदगीर शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांविरोधात कारवाई करत सुमारे ५० हजार ९२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सतीश भानुदास पवार (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख शोयब हुसेनसाब (वय २०, मूळ रा. मादलापूर, ता. उदगीर, सध्या हनुमान नगर, सिग्नल क्र. २, उदगीर) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६८/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

दि. २९ जून २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शाहू चौक मार्गावरील स्टार पानशॉप अँड कोल्ड्रिंक्स परिसरात आरोपी हा एमएच-२४-झेड-५२८६ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कुटीच्या डिकीत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला व तंबाखुजन्य गुटखा बाळगून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करून ५०,९२१ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी १६ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थांची माहिती असूनही आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची वाहतूक व बाळगणूक करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले.

ही कारवाई उदगीर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर करीत आहेत.

Related to this topic: