Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हळद खरेदीचा शुभारंभ

'व्ही आर ऍग्रो' मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळद खरेदीचा शुभारंभ

पानकनेरगावातील 'व्ही आर ऍग्रो' येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळद खरेदीचा भव्य शुभारंभ झाला, बळीराजाचा सन्मान केला गेला व सल्लागार व्यापाऱ्यांच्या सल्ल्याने मोलाची मदत केली.


व्ही आर ऍग्रो मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळद खरेदीचा शुभारंभ

Turmeric Price |

बळीराजाचा सन्मान अन् दरांबाबत व्यापाऱ्यांचा मोलाचा सल्ला

पानकनेरगाव (Turmeric Price) : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पानकनेरगाव येथील 'व्ही आर ऍग्रो' येथे गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर नवीन हळदीच्या खरेदीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. "जगाचा पोशिंदा" असलेल्या बळीराजाच्या कष्टाचा सन्मान करत, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

पानकनेरगाव हे गाव भौगोलिकदृष्ट्या दोन्ही विभागांच्या सीमेवर असल्याने, येथील बाजारपेठेत विदर्भातील वाशिम जिल्हा व मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात आवक होते. शुभारंभाच्या प्रसंगी भागवत डोंगरे पानकनेरगाव, महादेव खेडेकर पानकनेरगाव, संतोष मवाळ (महागाव), ऋतिक मवाळ (महागाव) आणि तेजनकर (महागाव, ता. रिसोड) यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

हळद उत्पादनात घट, पण दरात चढ-उताराचे चित्र

पावसाळ्यात  झालेल्या अतिवृष्टीमुळे (Turmeric Price) हळद पिकावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हळदीच्या दरात काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे. तरीही, मुहूर्ताच्या दिवशी 'व्ही आर ऍग्रो' येथे समाधानकारक दर मिळाले.

गठ्ठा हळद: १२,००० ते १३,००० रुपये प्रति क्विंटल.
कांडी हळद: १२,५०० ते १३,५०० रुपये प्रति क्विंटल.
शेतकऱ्यांनी घाई करू नका, व्यापारी रामेश्वर हेन्द्रे यांचा सल्ला

यावेळी बोलताना (Turmeric Price) हळद व्यापारी रामेश्वर हेन्द्रे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "सध्या जागतिक परिस्थितीमुळे बाजार काहीसा दबावात आहे, परंतु युद्ध संपुष्टात आल्यानंतर भविष्यात हळदीचे दर पुन्हा वधारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात एकदम गर्दी न करता, हळद टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणावी. जेणेकरून बाजारात मोठी घसरण होणार नाही आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल."

पानकनेरगाव परिसरातील हळद ही अत्यंत दर्जेदार असल्याने तिला देशातील विविध राज्यांमध्ये मोठी मागणी आहे. दर्जेदार प्रतवारी आणि विश्वासार्ह व्यवहार यामुळे या केंद्राचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

Related to this topic: