Gram Panchayat Fund: ९ बाळापूर-पातूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 'मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी
'मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने'तून मिळणार हक्काची इमारत; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
खासदार अनुप धोत्रे, माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा यशस्वी पाठपुरावा
पातूर (Gram Panchayat Fund) : २९ बाळापूर-पातूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 'मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने' अंतर्गत मतदारसंघातील एकूण ५ ग्रामपंचायतींच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी *१ कोटी ५ लक्ष रुपयांचा ऐतिहासिक निधी* मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून हक्काच्या आणि सुसज्ज इमारतीची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा एकाच छताखाली आणि चांगल्या वातावरणात मिळाव्यात, यासाठी या योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. मतदारसंघातील पाच गावांचा यात समावेश असून, यामुळे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
या ग्रामपंचायतींना मिळाला निधी:
मंजूर झालेल्या १ कोटी ५ लक्ष रुपयांच्या निधीचे वाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे:
पिंपळखुटा ग्रामपंचायत (ता. पातूर): २५ लक्ष रुपये
माळराजुरा ग्रामपंचायत (ता. पातूर): २० लक्ष रुपये
बोडखा ग्रामपंचायत (ता. पातूर): २० लक्ष रुपये
राहेर ग्रामपंचायत (ता. पातूर): २० लक्ष रुपये
काझीखेड ग्रामपंचायत (ता. बाळापूर): २० लक्ष रुपये
नेत्यांचे मानले आभार
बाळापूर-पातूर मतदारसंघातील विकासकामांचा हा (Gram Panchayat Fund) आलेख असाच उंचावत राहण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे, खासदार मा. श्री. अनुपभाऊ धोत्रे तसेच आमदार मा. बळीरामभाऊ सिरस्कार यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच हा निधी खेचून आणण्यात यश आले असून, मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
"जनतेचा विश्वास, विकासाचा श्वास!" हे ब्रीद घेऊन मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत. हा निधी म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या विश्वासाची पावती आहे, अशा भावना स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.