शुभमने मिळवलेल्या यशामुळे तो आता औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) मधील उच्च शिक्षणासाठी पात्र ठरला आहे.
नांदेड (GPAT 2026 Success) : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS), नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या GPAT 2026 परीक्षेत हदगाव तालुक्यातील धानोरा (आडा) येथील सुपुत्र चि. शुभम विष्णू भवर याने घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाने त्याने केवळ आपल्या गावाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
शुभमने मिळवलेल्या या यशामुळे तो आता औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) मधील उच्च शिक्षणासाठी पात्र ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेत यश मिळवणे हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते, मात्र शुभमने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे साध्य करून दाखवले.
आपल्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना शुभमने याचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एम. डी. किटूकले, प्रा. आर. डी. वानोले, तसेच आपले आजी-आजोबा दत्तराव भवर व सौ. शांताबाई भवर आणि आई-वडील विष्णू भवर व सौ. सुनंदा भवर यांना दिले आहे.
शुभमच्या या यशाबद्दल डॉ. प्रियंका ठाकरे, डॉ. गजानन कनवाळे, फार्मासिस्ट शिवदास शिंदे, संकेत शिंदे, राहुल शिंदे, तुकाराम कवाने, अविनाश व सौ. अनघा मईन्ग, संतोष व सौ. पूजा सूर्यवंशी, सोपानराव व सौ. सुमन काळे, नामदेव व सौ. कोमल सूर्यवंशी तसेच संपूर्ण भवर परिवाराने त्याचे अभिनंदन केले आहे. शुभमच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.