Go Samman Abhiyan: गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा आणि संपूर्ण देशात गोहत्या बंद व्हावी या मागणीसाठी ‘गो सम्मान आह्वान अभियान’चा दुसरा टप्पा 27 जुलै 2026 रोजी राबवण्यात येणार आहे.
हिंगोली (Go Samman Abhiyan) : गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा आणि संपूर्ण देशात गोहत्या बंद व्हावी या मागणीसाठी ‘गो सम्मान आह्वान अभियान’चा दुसरा टप्पा 27 जुलै 2026 रोजी राबवण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 लाख स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हिंगोली शहर व ग्रामीण भागात ही स्वाक्षरी मोहीम 6 ते 26 जुलै 2026 या कालावधीत राबवली जाईल. दररोज सायंकाळी 7.15 ते 9 वाजेपर्यंत प्रत्येक भागात किमान 5 कार्यकर्त्यांच्या गटाद्वारे घरोघरी जाऊन स्वाक्षऱ्या गोळा केल्या जाणार आहेत.
या (Go Samman Abhiyan) अभियानासाठी शहरातील विविध भागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नवा मोंढा, भट्ट कॉलनी, तोफखाना, जवाहर रोड या भागाची जबाबदारी ओम सारडा, रवि चौरसिया, महेश लदनिया, विवेक विनयदास आणि इतर गौभक्त पाहतील. गाडीपुरा, कोमटी गल्ली, गोलंदाज गल्ली, कपडा गल्ली येथे गजाननसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम चालेल. अंबिका टॉकीज, काबरा जिन, आंबेडकर चौक ते इंदिरा चौक, गांधी चौक ते खुराना पेट्रोलपंप, भाजी मंडई, मेडिकल लाईन या भागात अनिल खांडल, दिपक निमोदिया, ईश्वर प्रजापती, प्रल्हाद बासटवार आणि गौभक्त जबाबदारी सांभाळतील. ग्रामीण पोलीस स्टेशन ते माहेश्वरी भवन परिसरात राजेंद्र हलवाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
ही (Go Samman Abhiyan) मोहीम भारतीय विद्या मंदिर, माणिक स्मारक आर्य विद्यालय आणि सरजुदेवी आर्य कन्या विद्यालय येथे उद्या स्वाक्षरी पत्रके दिली जातील. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना विनंती पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहेत. अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गौभक्तांनी 9422176610, 9422176782, 9970836861, 8624040792 या क्रमांकांवर संपर्क साधावा. स्वाक्षरी पत्रके संबंधित कार्यकर्त्यांकडून किंवा पीडीएफ स्वरूपात प्राप्त करता येतील. प्रत्येक रविवारी अभियानाबत आढावा बैठक घेण्याचेही ठरले असल्याची माहिती गो सम्मान आह्वान अभियान भारत, हिंगोली यांच्यावतीने देण्यात आली आहे.