Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > पुणे

Govind Upase Murder

मेसेजवरून वाद अन् थेट खून! पुण्यातील व्यक्तीचे सांगलीत अपहरणानंतर हत्याकांड

नात्यातील एका महिलेला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या कारणातून निर्माण झालेला वाद टोकाला गेल्याचे समोर आले आहे.


मेसेजवरून वाद अन् थेट खून पुण्यातील व्यक्तीचे सांगलीत अपहरणानंतर हत्याकांड

Govind Upase Murder |

गोविंद उपासे हत्या प्रकरणाचा उलगडा; आंबेगाव पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक

पुणे : नात्यातील एका महिलेला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या कारणातून निर्माण झालेला वाद टोकाला गेल्याचे समोर आले आहे. या वादातून गोविंद उपासे (वय 59, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) यांचे पुण्यातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना सांगलीत नेऊन मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार पोलिस तपासातून उघडकीस आला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणात तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (वय 28, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर (वय 25, रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली) आणि रोहन जयसिंग सावंत (वय 23, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत गोविंद उपासे यांचा मुलगा रोहित गोविंद उपासे (वय 35, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

जेवणासाठी घराबाहेर पडले अन् पुन्हा परतलेच नाहीत

पोलिसांच्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजता गोविंद उपासे मित्रांसोबत सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे जेवण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आरोपींनी संपर्क साधला.

फोन आल्यानंतर मित्रांसोबत बाहेर जाऊन येतो, असे सांगून उपासे दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर ते पुन्हा घरी आले नाहीत. वडील बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा मुलगा जयवंत यांनी 11 ऑगस्ट रोजी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

सांगलीत भांडणाची माहिती मिळाल्यानंतर तपासाला वेग

दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी सांगली शहरातील शामरावनगर परिसरातील घोड्याच्या तबेल्याजवळ भांडण सुरू असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातोबा उर्फ वैभव केंगार, राहुल बाबर आणि रोहन सावंत यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपींनी गोविंद उपासे यांचे पुण्यातून अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आले. त्यानंतर उपासे यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह कडेगाव परिसरातील कालव्यात टाकल्याचे आरोपींनी सांगितल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नांदेड सिटी पोलिसांना दिल्यानंतर तपासाला अधिक वेग आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता उपासे यांना मारहाण केल्यानंतर आरोपी कारमधून घटनास्थळावरून निघून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव आणि संबंधित पोलीस पथकांकडून सुरू आहे.

Related to this topic: