Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मोफत शासकीय योजना

वेंकटेश नेत्रालयातून शासकीय योजनांचा मोफत लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

नेत्र रुग्णांनी वेंकटेश नेत्रालय व फेको सेंटर मधून मोफत शासकीय योजनांच्या माध्यमातून रीतसर लाभान्वित व्हावे, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ह्यांनी केले.


वेंकटेश नेत्रालयातून शासकीय योजनांचा मोफत लाभ घ्यावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Venkatesh Netralaya |

हिंगोली (Venkatesh Netralaya) : नेत्र रुग्णांनी वेंकटेश नेत्रालय व फेको सेंटर मधून मोफत शासकीय योजनांच्या माध्यमातून रीतसर लाभान्वित व्हावे, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) ह्यांनी केले. व्यंकटेश नेत्रालय अँड फेको सेंटर मध्ये हिंगोली येथे नेत्ररुग्ण सेवार्थ जागतिक कीर्तीच्या कंपन्यांच्या विविध मशिनरी व संगणकीय यंत्रणा च्या शुभारंभ करताना ते बोलत होते. भाजपा नेते  गजाननराव घुगे, महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्यकार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार,समाजभूषण विक्रम जावळे,ज्येष्ट समाजसेवक दुर्गादास साकळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. सचिन बोधगिरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या (Venkatesh Netralaya) प्रसंगी डॉ. किशन लखमावार व  डॉ. प्रतीक लखमावार ह्या नेत्रशल्य चिकित्सकानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व उपस्थितांना माहिती दिली ह्यात Tomey Swept Source Optical Biometer आणि B-Scan या अत्याधुनिक मशीनची जिल्ह्यात प्रथमच सुरुवात करण्यात आली, असे सांगून  या तंत्रज्ञानामुळे डोळ्यांचे अचूक मोजमाप होऊन मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कृत्रिम लेन्सची योग्य पॉवर निश्चित करता येणार आहे. परिणामी, ऑपरेशननंतर चष्म्याचा नंबर कमी राहण्यास किंवा काही रुग्णांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे.

तसेच, B-Scan मशीनमुळे रेटिनाचे विकार, रक्तस्त्राव व इतर अंतर्गत डोळ्यांचे आजार अधिक अचूकपणे ओळखणे शक्य होणार आहे असे म्हंटले.या आधुनिक सुविधेमुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांना छत्रपती संभाजी नगर किंवा मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ.किशन लखमावार  उच्च विद्याविभूषित फेको  व रेटिना  सुपर स्पेशालिस्ट डॉ.प्रतिक लखमावार ह्यांनी ह्याप्रसंगी दिली.

वेंकटेश नेत्रालय (Venkatesh Netralaya) येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रेटिनाचे उपचार उपलब्ध असून, सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे, असेही ह्या तज्ञ डॉ. मंडळींनी सांगितले. ह्या प्रसंगी ज्योत्स्ना लखमावार,डॉ. नेहा बोधगिरे, माँही बोधगिरे व हॉस्पिटल स्टाफ,नेत्र रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.डियो प्रज्वलनाने व फित कापून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) ह्यांनी उद्घाटन केले व बारकाईने संगणकीय अत्याधुनिक यंत्रणेची माहिती घेतली.स्वागतपर प्रास्ताविक डॉ.किशन लखमावार तर संचालन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रतीक लखमावार ह्यांनी केले.

Related to this topic: