Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड व पाणीपुरवठा यंत्रणेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड (कचरा डेपो) तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.


कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड व पाणीपुरवठा यंत्रणेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

Government Inspection |

हिंगोली (Government Inspection) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंड (कचरा डेपो) तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

कळमनुरी येथील डंपिंग ग्राऊंडला भेट देऊन त्यांनी कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, स्वच्छता उपाययोजना, कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट प्रक्रिया यांचा आढावा घेतला. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचरा डेपोची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पंपगृहाला भेट देऊन तेथील यंत्रणा, पाण्याचा पुरवठा, दाब व वितरण व्यवस्थेची पाहणी केली. नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा मिळावा यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या तसेच उद्भवणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related to this topic: