Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गोरेगाव वादळी वारा

गोरेगावात वादळी वाऱ्याने हाहाकार: महादेव मंदिराचा घुमट कोसळला, धर्मशाळेची भिंत पडली

Goregaon's Stormy Winds: गोरेगाव येथील वादळी वाऱ्यामुळे श्री बगारी महादेव मंदिरात धर्मशाळा व घुमट पूर्णपणे कसले गेल्या. पडझडामुळे जिवंतहानी झालेल्यांची खबर नाही.


गोरेगावात वादळी वाऱ्याने हाहाकार महादेव मंदिराचा घुमट कोसळला धर्मशाळेची भिंत पडली

Goregaon's Stormy Winds |

गोरेगाव (Goregaon's Stormy Winds) : दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली.

या (Goregaon's Stormy Winds) वादळाचा सर्वात मोठा फटका श्री बगारी महादेव मंदिर आणि परमपूज्य भीमाशंकर महाराज संस्थानच्या धर्मशाळेला बसला. वाऱ्याच्या प्रचंड वेगाने धर्मशाळेची भिंत कोसळली. भिंतीवरील तीनही टीनपत्रे उडून थेट मुख्य मंदिरावर आदळली.

या (Goregaon's Stormy Winds) धडकेमुळे मंदिरावरील घुमट पूर्णपणे कोसळला. तसेच छतावरील कठड्याची नक्षीदार बांधकामे व सजावट ढासळून पडली. या दुर्घटनेत मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मंदिर परिसरात मोठी पडझड झाली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.