Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > विदर्भ > गोंदिया

तलावात गायीचे अवशेष

गोरेगाव येथे तलावात गायीचे अवशेष आढळल्याने खळबळ

Goregav Cow Dead Body: गोरेगाव तालुक्यातील तलावात गाईंच्या अवशेषांचे खंडित अवशेष दिसले, पोलिस गुन्हा दाखल केला आहे. गाईंच्या पाण्याच्या फेकण्यामुळे तलावात पाणी दूषित झाले आहे.


गोरेगाव येथे तलावात गायीचे अवशेष आढळल्याने खळबळ

Goregav Cow Dead Body |


पाणी दूषित झाल्याने नागरिकांची चिंता वाढली 
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

गोरेगाव/ गोंदिया (Goregav Cow Dead Body) : स्थानिक तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या तलावात दोन गाईंची मुंडकी आणि कातडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार आज, ३० मे रोजी सकाळी उघडकीस आला. या घृणास्पद घटनेमुळे गोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की,   आज सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना तहसील कार्यालयामागील तलावात गाईचे अवशेष तरंगताना दिसले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेचे गांभीर्य ओळखून गोरेगाव पोलीस प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर अवशेषांचे नमुने (सॅम्पल) तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच, पोलिसांनी घटनास्थळाची आणि आजूबाजूच्या परिसराची सखोल पाहणी करून पंचनामा पूर्ण केला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. ज्या तलावात हा प्रकार घडला आहे, त्याला लागूनच जंगल परिसर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील अनेक वन्यप्राणी तहान भागवण्यासाठी याच तलावावर येतात. तसेच, गावातील गुराखी त्यांच्या म्हशी, शेळ्या आणि इतर पाळीव प्राण्यांनाही पाणी पाजण्यासाठी याच तलावावर आणतात. मात्र, (Goregav Cow Dead Body) गायीचे अवशेष फेकल्यामुळे तलावातील पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी पिल्याने वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

या निंदनीय कृत्यामुळे गोरेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाने (Goregav Cow Dead Body) दूषित पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तलावाची स्वच्छता करावी आणि वन्यप्राण्यांचा जीव वाचावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच, या घटनेमागे असलेल्या समाजकंटकांचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गोरेगावच्या जनतेकडून केली जात आहे.

Related to this topic: