Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गोमाता राष्ट्रमाता दर्जा

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळण्यासाठी देशव्यापी अमियानाची घोषणा

Gomata National Mother Status: हिंगोलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी देशव्यापी अभियानाची घोषणा करण्यात आली. या अभियानात अनेक महत्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे.


गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळण्यासाठी देशव्यापी अमियानाची घोषणा

Gomata National Mother Status |

हिंगोली (Gomata National Mother Status) : गो सन्मान आव्हान अभियानाच्या संदर्भात आज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गोसेवक प्रकाशचंद्र सोनी, दिपक निमोदिया, प्रदिप धडवाई, राजेंद्र हलवाई आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाचे अध्यक्ष नंदी बाबा असून गोमाता व सर्व देवी-देवता या अभियानाचे संरक्षक आहेत. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि संपूर्ण भारतात गो हत्या पूर्णपणे बंद व्हावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे देशव्यापी अभियान राबवण्यात येत आहे.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता देशातील ५४०० तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या नावाने प्रार्थना पत्र व निवेदन देण्यात येणार आहे. शासनाने तीन महिन्यांत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निर्णय झाल्यास सर्व गौभक्त शासनाचे आभार मानतील. परंतु निर्णय न झाल्यास हे अभियान अधिक तीव्र करण्यात येईल. या अभियानाचे पुढील टप्पे असे असणार आहेत.

ज्यामध्ये २७ जुलै भारतातील ७५० जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रार्थना पत्र, २७ ऑक्टोबर प्रत्येक राज्याच्या राजधानीत प्रार्थना पत्र, २७ फेब्रुवारी २०२७ दिल्लीतील रामलीला मैदानावर ७५० जिल्ह्यांमधून प्रत्येकी २०० महात्मे व गोसेवक ७ दिवस संकीर्तन करतील. १५ ऑगस्ट शासनाच्या निर्णयाची अंतिम मुदत कायदा झाल्यास १६ ऑगस्टला आभार प्रदर्शन, निर्णय न झाल्यास ५ संत आणि २ गोभक्त आमरण अनशन करणार आहेत. या (Gomata National Mother Status) अभियानाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली.

Related to this topic: