Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

सोन्याच्या लालसापोटी वैरागड येथे खोदकाम

आरमोरी तालुक्यातील विराट नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वैरागड येथे मध्यरात्री कजली लाऊन सोन्याच्या लालसापोटी खड्डे खोदून सोने काढीत असल्याचे प्रकार घडत  आहेत.


सोन्याच्या लालसापोटी वैरागड येथे खोदकाम

Gold Smuggling |

सबंधितावर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी

वैरागड (Gold Smuggling) : आरमोरी तालुक्यातील विराट नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वैरागड येथे मध्यरात्री कजली लाऊन सोन्याच्या लालसापोटी खड्डे खोदून सोने काढीत असल्याचे प्रकार घडत  आहेत. यामुळे  संबंधितावर  पोलीस  विभागाने  कारवाई करावी अशी मागणी  वैरागड येथील भाविक जनता आणि नागरिकांनी केली आहे.

वैरागड विराट नगरीस ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे प्रसिद्ध किल्ला, भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई मंदिर, पाच पांडव देवस्थान तसेच शेकडो मंदिरे आहेत. पुरातन काळात नागरिकांनी जमिनीत सोना पुरवून ठेवले असल्याची माहिती घेत अनेक सोने चोरटे मध्यरात्री कजली लाऊन खड्डे खोदून सोना काढीत असल्याचे प्रकार अनेक वर्षापासून घडत आहेत. येथील किल्ल्या पासून पूर्वेस १०० मीटर अंतरावर किल्ल्याच्या खंदकाच्या पारिवर ग्रामीण भाषेत घंट्याचे झाड असून तेथे भाविकांचे श्रद्धास्थान माऊलीचे मंदिर होते. काळाच्या ओघात मंदिर गडप झाल्याने तेथे फक्त गोट्यांचे अवशेष आहे. त्याच ठिकाणी १० ते १५ दिवसापूर्वी सोना चोरट्यांनी मध्यरात्री कजली लाऊन ६ ते ७ खड्डे खोदले आणि खड्ड्यावर शेंदूर, कुंकू, नारळ, अगरबत्ती, कपडे ठेवले तसेच सोना मिळाल्याने झाडाच्या खाली शंकर देव यांच्या नंदीची मूर्ती स्थापन केली. आज दि. २३ मार्च २०२६ रोजी गावातील एका भाविकाने नवस फेडण्याचे कार्यक्रम करण्यासाठी तेथील काही खड्डे बुजवून साफ सफाई केली.

वैरागड येथील ऐतिहासिक किल्ला आणि भंडारेश्वर देवस्थान पुरातत्व विभागाखाली असल्याने अशा प्रकाराची  पुरातत्व विभाग आणि आरमोरी पोलिस ठाण्याने चौकशी करून कजली लाऊन सोना काढणार्‍यावर  कारवाई  करावी अशी मागणी भाविक जनता आणि नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: