Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Ashadhi Ekadashi

गोकर्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी

Ashadhi Ekadashi: जिल्ह्यातील हजारो भाविक दाखल झाल्याने गोकर्णेश्वर माळरान परिसरात भाविकांचा मोठा जनसागर ऊसळला होता जणू काही अवतरली भाविकाची पंढरी


गोकर्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी

Ashadhi Ekadashi |

 

औंढा नागनाथ येथे भाविकांचा आषाढी एकादशीनिमित्त उसळला जनसागर

औंढा नागनाथ (Ashadhi Ekadashi) : येथील वन विभागाच्या उंच डोंगरावर गोकर्णेश्वर माळरान परिसरात असलेल्या गोकर्ण ईश्वर महादेवाचे 25 जुलै रोजी शनिवारी आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी पंचकोशीतील सह हिंगोली परभणी नांदेड, अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक दाखल झाल्याने गोकर्णेश्वर माळरान परिसरात भाविकांचा मोठा जनसागर ऊसळला होता जणू काही अवतरली भाविकाची पंढरी असे दिसून आले.

औंढा नागनाथ येथील गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्याने साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होते. अशी भाविकांची श्रद्धा असल्याने सकाळपासून भाविकांनी डोंगर घाटाचा रस्ता चढून गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या निसर्गाच्या साधनात ही मंदिर असल्याने भाविकांनी डबे व फराळाचे साहित्य सोबत आणून वनभोजनाचा आनंद घेतला. सदरील ठीक ठीक ठिकाणी  वन विभागाच्या वन पर्यटन परिसरात असल्याने वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक ,वन परिमंडळ अधिकारी स्वाती कीर्तनकार ,वनपाल माधव जावडे ,वनपाल सुदर्शन पोले, वनरक्षक वनराज राठोड व्ही एस सिरसागर किशोर आयनीले शंकर गांजवे कैलास बेले सविता राठोड.  काशिनाथ शिंदे गंगाधर शिंदे,  तसेच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे ,उप पोलीस निरीक्षक शेख फोटोस उप पोलीस निरीक्षक अमोल इंगोले. श्रीधर वाघमारे जमादार दिलीप नाईक. जमादार संदीप टाक. जमादार बबन आरे जमादार देविदास राठोड.  अमोल चव्हाण. राजकुमार केंद्रे.  पंजाब चव्हाण.  यांच्यासह पोलिसा अधिकारी वन कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 'हर हर महादेव बम बम भोले' च्या गजरात दिवसभरात दोन लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती वन प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related to this topic: