Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गोदा ते नर्मदा जल यात्रा

गोदा ते नर्मदा जल यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे; खा. रामराव वडकुते यांचे आवाहन

Goda to Narmada Jalyatra: खा. रामराव वडकुते यांनी मराठवाड्यातील नागरिकांना जल यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या यात्रेचा उद्देश जलव्यवस्थापनाची माहिती व प्रेरणा पोहोचवणे आहे.


गोदा ते नर्मदा जल यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे खा रामराव वडकुते यांचे आवाहन

Goda to Narmada Jalyatra |

हिंगोली (Goda to Narmada Jalyatra) : विश्वनेते प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या "विकसित भारत २०४७" या संकल्पनेनुसार देशाला पूर्णतः विकसित, आत्मनिर्भर आणि समावेशक राष्ट्र बनवण्याच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र राज्याची भुमिका महत्वाची आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. अमित शाहजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरु आहे. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व व दुरदृष्टी यातून महाराष्ट्र राज्याला देशातले सर्वात प्रगत, समृध्द आणि सक्षम राज्य बनवण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून "दुष्काळमुक्त महाराष्ट्र" या संकल्पनेतील महत्वकांक्षी सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी जलसंपदा विभाग सर्व पातळ्यांवर मिशन मोडवर काम करत आहे.

महाराष्ट्राच्या भुमीतील थोर सुपुत्री, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात संपूर्ण देशभरात जलव्यवस्थापन, बारव-निर्मिती आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे जे अभूतपूर्व व दूरदृष्टीचे कार्य केले, त्याची माहिती आणि प्रेरणा आजच्या पिढीला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याच उदात्त हेतूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन आणि जल व्यवस्थापनाबाबत व्यापक लोकजागृती' करण्याच्या एकमेव उद्देशाने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एका विशेष माहितीपूर्ण आणि सांस्कृतिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या "गोदा ते नर्मदा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा २०२६" च्या नाममुद्रेचे अनावरण मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सदरची ऐतिहासिक जल यात्रा (Goda to Narmada Jalyatra) दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या 'चौंडी' (जि. अहिल्यानगर) आणि गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या 'त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून एकाच वेळी सुरू होईल. या यात्रेमध्ये सुरुवातीला ५०० 'जल-यात्री' सहभागी होणार असून, ते आपल्यासोबत महाराष्ट्रातील ३० विविध नदी खोऱ्यांतील पवित्र जल आणि चौंडी येथील पवित्र माती कलशात घेऊन मार्गक्रमण करतील.

ही (Goda to Narmada Jalyatra) जल यात्रा महाराष्ट्रातील ५ जिल्हे आणि मध्य प्रदेशातील २ जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे. जन जागृती यात्रा क्र.२ ही दिनांक २५ रोजी सकाळी ११वाजता चौंडी येथून निघून अहिल्यानगर येथे पोहचेल. याच दिवशी यात्रा क्र १ सकाळी ९ वाजता त्रिंबकेश्वर ते संगमनेर,संगमनेर ते शिर्डी,शिर्डी ते घृष्णेश्वर,घृष्णेश्वर ते गौताळा घाट मार्गे दिनांक २९ एप्रिल रोजी धुळे ते माहेश्वर अशी राहील.

दरम्यान, या (Goda to Narmada Jalyatra) प्रवासात ठिकठिकाणी जलव्यवस्थापनाचे महत्त्व आणि अहिल्यादेवींच्या जल-कार्यावर प्रकाश टाकणारे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात्रेचा भव्य समारोप दिनांक २९ एप्रिल  रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची कर्मभूमी असलेल्या माहेश्वर (जि. खरगोन, मध्य प्रदेश) येथे संपन्न होईल.
या जल यात्रेत मराठवाडयातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सह‌भागी व्हावे असे आवाहन खासदार रामराव वडकुते यांनी केले आहे.

Related to this topic: