Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोट–रेगडी मार्ग

घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक; तातडीने दुरुस्तीची मागणी

Ghot-Regdi Road: घोट–रेगडीमार्गाचे दुरुस्ती करण्याचा आक्रमक मागणी राष्ट्रिय मानवाधिकार सांस्थाने करून, पावसामुळे बनलेल्या खड्ड्यांचा समाधान न करता त्वरित उपायाची मागणी केली गेल्या


घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आक्रमक तातडीने दुरुस्तीची मागणी

Ghot-Regdi Road |


अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा..

घोट (Ghot-Regdi Road) : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी घोट–रेगडी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. चामोर्शी, मुलचेरा व एटापल्ली तालुक्यांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.पावसाळ्यामुळे मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी केली.याप्रसंगी त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. घोट परिसरातील नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत घोट–रेगडी मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, चामोशी तालुका अध्यक्ष राकेश सरकार,विलास उईके, विलास वडेटीवार,विशाल दहिवले,पलास घरामी,दिनेश मुजुमदार आदी उपस्थित होते

Related to this topic: