Ghot Junior Science College: इयत्ता ११वीमध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक कक्षेत वाढ करण्याचे आघाडीचे निवेदन. बंगालील भाजपने जिल्हाध्यक्षाने तातडीच्या मागणी दाखल केली आहे.
अन्यथा भाजप बंगाली आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा..
घोट (Ghot Junior Science College) : घोट येथील जि.प. महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या प्रवेश क्षमतेत वाढ करून प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजप बंगाली आघाडी, जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोमकीन शाहा यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या महाविद्यालयात केवळ ६० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला असून,सुमारे २० विद्यार्थी अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत.मागील वर्षी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र यावर्षी प्रवेशसंख्या कमी करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घोट परिसरापासून सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात अन्य कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय (Ghot Junior Science College) उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश देण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा येत्या ७ दिवसांत विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास भाजप बंगाली आघाडी, गडचिरोलीच्या वतीने जि.प. शाळा घोट समोर प्रशासनाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी निवेदनातून देण्यात आला आहे.