International Yoga Day: भारत स्वाभिमान न्यास आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त प्रयत्नाने घोट येथे वैश्विक योग दिवस साजरा करण्यात आला. उपविभागीय महसूल अधिकारी संपत खलाटेंचा मुख्य उपस्थिती
पतंजली योग समितीच्या वतीने योग प्रात्यक्षिके
उपविभागीय महसूल अधिकारी संपत खलाटे यांची प्रमुख उपस्थिती
घोट (International Yoga Day) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत स्वाभिमान न्यास तथा पतंजली योग समिती, घोट यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला चामोर्शीचे उपविभागीय महसूल अधिकारी संपत खलाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी योगशिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाची प्रात्यक्षिके सादर केली. उपविभागीय महसूल अधिकारी संपत खलाटे यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद करत, प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य राजन गजभिये, योगशिक्षक विनय हलदार, प्राचार्य मनोज नागोसे, प्रा. सी. के. कांबळे, विलास गण्यारपवार, परशुराम दुधबावरे, अनिता पोरेड्डीवार, पत्रकार हेमंत उपाध्ये, बाबुराव भोवरे, अश्विनी वडेटीवार,विजयालक्ष्मी गण्यारपवार, ताराबाई उईके, संगीता वडेटीवार, पोलीस मित्र महिला संघटनेच्या अध्यक्षा रुम्पा शाहा,ग्रामपंचायत सदस्य आशा उपाध्ये,दिनकर लाकडे,बंडू जुवारे,विलास उईके,राकेश सरकार,विकास मैत्रय, महेश विश्वास,उमेश सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय महसूल अधिकारी संपत खलाटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी (International Yoga Day) पोलीस कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाभ्यास केला. नियमित योग, प्राणायाम आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब केल्यास निरोगी, तणावरहित व आनंदी जीवन जगता येते,असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भारत स्वाभिमान न्यास व पतंजली योग समिती,घोट यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.