Jaljeevan Mission Scheme: देवठाणा तालुक्यातील गावकऱ्यांनी जलजीवन मिशन योजनेवर विरोध व्यक्त करत पाणी पुरवठ्याच्या अडचणीबद्दल टाकीत चढून शांतिपूर्ण आंदोलन केले.
जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप
हिंगोली (Jaljeevan Mission Scheme) : तालुक्यातील देवठाणा येथे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून जलजीवन मिशन योजनेचे काम करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत नळाला पाणीच आले नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी ८ जुलै बुधवार रोजी पावसाळ्यात पाण्याच्या टाकीवर चढून शेले स्टाईल आंदोलन केले आहे. मात्र बराच वेळ होऊन ही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गावात पोहचले नाही. त्यामुळे गावकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
देवठाणा येथे जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आले. मात्र गावात करण्यात आलेल्या नळयोजनेला पाणीच आले नाही. उन्हाळ्यातही गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. आता पावसाळा लागला तरीही नळाला पाणी अद्यापही आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गावकऱ्यातून केली आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्यासह ज्ञानेश्वर राऊत, प्रवीण क्षीरसागर, सुनील धवसे, राहुल धवसे, नवनाथ भोयर, विशाल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.