Breaking News
  • तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके भाजपला सोडणार ?
  • धक्कादायक खुलासा! मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात ‘झिंक फॉस्फाइड’ विषाचे धागेदोरे सापडले
  • दहावी निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के; मुलींची पुन्हा आघाडी
  • TCS ‘धर्मांतर’ प्रकरणात मोठी घडामोड; नारेगावातून निदा खान अटकेत
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

गौ सम्मान मोहिम

कन्हानमध्ये राबवली 'गौ सम्मान आव्हान मोहिम'; विविध मागण्यांसाठी प्रार्थना

Cow Samman Mission: कन्हान येथे 'गौ सम्मान आव्हान मोहिम' अंतर्गत राष्ट्रपती व पंतप्रधानांना गौ हत्या बंद, गाईला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या मागण्यांसह प्रार्थना पत्रे पाठवण्यात आली.


कन्हानमध्ये राबवली गौ सम्मान आव्हान मोहिम विविध मागण्यांसाठी प्रार्थना

Cow Samman Mission |

 

तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधानांना विविध मागणीचे प्रार्थना पत्र

कान्हान (Cow Samman Mission) : कन्हान शहर आणि ग्रामीण भागात "गौ सम्मान आव्हान मोहिम" (Cow Samman Mission) राबविण्यात आली . या मोहिमे अंतर्गत , पारशिवनी तहसीलचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्यामार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना विविध मागणीचे प्रार्थना पत्र पाठविण्यात आले. यामध्ये देशात गौ हत्या बंदी , गाईला राष्ट्रमाता म्हणून घोषित करणे , गोसंरक्षणासाठी केंद्रीय कायदा करणे आणि गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"गौ सम्मान आव्हान" (Cow Samman Mission) मोहीम देशभरातील संत आणि गो भक्तांनी आयोजित केली होती. गाईला "राष्ट्रमाता" दर्जा देणे , देशात गौ हत्या बंदी झाली पाहिजे , केंद्रीय कायदा करणे , गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रात मंत्रालय स्थापन करणे आणि जनावरांना योग्य संरक्षण सुनिश्चित करणे यांसाठी केंद्र सरकारला जागरूक करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेचा प्रभाव परशिवनी तहसील मध्ये ही दिसून आला. प्रशु प्रेमी शुभम बावनकर , आयुष संतापे , निखिलेश चाकोले , गौरव तिवारी आणि इतर तरुणांनी कन्हान , कांद्री , टेकाडी , खदान, वरडा, खेडी, गहु हीवरा आणि निलाज यांच्या सह आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये 'गौमाता सम्मान अभिमान' मोहीम राबविण्यात आली . स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली आणि मोहिमेबद्दल पत्रके वाटून लोकांना माहिती देण्यात आली. हजारो लोकांनी या मोहिमेत सामील झाले आणि त्यांनी स्वाक्षरी केली. गोशाळांना पाठिंबा देणे , गायींचे संरक्षण करणे आणि समाजात गोमातेबद्दल आदर व जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

नियोजनानुसार, सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी देशभरात तहसील आणि जिल्हा स्तरावर एक मोठा निवेदन सादर करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Cow Samman Mission) कन्हान मध्ये, पशुप्रेमी आणि गौ भक्तांनी सोमवारी (२७ एप्रिल) शिव पंचायत हनुमान मंदिरात गौमातेची विधीवत पूजा अर्चना केली. यानंतर पारशिवनी तहसीलचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपती श्रीमती एस. द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना प्रार्थना पत्र पाठवुन देशात गौहत्येवर पूर्ण बंदी घालावी , गाईला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे , गोसेवेसाठी केंद्रीय कायदा करावा आणि स्वतंत्र गोसेवा केंद्रात मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी रंजना किरपाने , अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , मीना कळंबे , शुभम बावनकर , आयुष संतापे , निखिलेश चकोले , विनोद यादव , ऋषभ बावनकर , राजेश देशमुख , मुकुंदा नैरकर , चक्रधर खेरगडे , विष्णु वाढई , गौरव तिवारी , बंडुजी गजभिए , सुभाष बोरीकर , राहुल रेवतकर , अरुण वाघमारे , प्रवीण पवार , बंटी गजभिए , कमलाकर बंड सह आदि नागरिक उपस्थित होते.

Related to this topic: