Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गॅस सिलेंडर टंचाई

गॅस सिलेंडर टंचाईमुळे एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा

Gas cylinder shortage: कळमनुरीत गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. दररोज ३४२ सिलेंडरचा पुरवठा होत असून, २५००-२७०० बुकिंग होत आहेत.


गॅस सिलेंडर टंचाईमुळे एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा

Gas cylinder shortage |

कळमनुरी (Gas cylinder shortage) : शहरात मागील एक महिन्यापासून गॅस सिलेंडर टंचाईची समस्या तीव्र झाली असून, स्थानिक गॅस एजन्सीवर दररोज ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या एजन्सीकडे दोन ते तीन दिवसांत केवळ सुमारे ३४२ गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असताना दररोज २५०० ते २७०० गॅस सिलेंडर साठी  ऑनलाईन बुकिंग होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

एक गॅस सिलेंडर सध्या ९३९ रुपयांना मिळत असूनही नागरिकांना वेळेवर (Gas cylinder shortage) सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. परिणामी, एजन्सीसमोर दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, २१ एप्रिल रोजी काही ग्राहकांनी त्यांची ऑनलाईन बुकिंग रद्द झाल्याची तक्रार करत एजन्सीवर गर्दी केली होती. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नायब तहसीलदार अमोल घुगे यांनी तत्काळ एजन्सीला भेट दिली. त्यांनी नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत ग्राहकांच्या संख्येचे समाधान केले.

ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता एजन्सी परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच उन्हाचा तीव्र कडाका लक्षात घेऊन नागरिकांसाठी सावली व बसण्याची व्यवस्था करावी, अशा  सूचना नायब तहसीलदारांनी दिल्या आहेत. तथापि, पुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना अजून काही दिवस अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: