Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

गंगाखेड तलाठी लाच

परभणीत लाचेची मागणी करणार्‍या तलाठ्यावर कारवाई

Gangakhed Talathi Bribery Case: गंगाखेड येथे वाटणी पत्रानुसार फेर ओढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.


परभणीत लाचेची मागणी करणार्‍या तलाठ्यावर कारवाई

Gangakhed Talathi Bribery Case |

फेर ओढण्यासाठी मागीतली रक्कम गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल ...!

परभणी (Gangakhed Talathi Bribery Case) : गंगाखेड येथे वाटणी पत्रानुसार फेर ओढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाच मागीतल्याप्रकरणी सदर तलाठ्यावर शनिवार १५ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर कारवाई केली आहे.  रमेश त्र्यंबकराव लटपटे वय ४८ वर्ष तलाठी नेमनुक सज्जा पडेगाव, अतिरिक्त पदभार सज्जा झोला तहसिल कार्यालय गंगाखेड असे लाच मागणार्‍या तलाठ्याचे नाव आहे.

वाटणीपत्रानुसार दोन भावांच्या नावे फेर घेण्यासाठी सदर  तलाठ्याने २५ हजार मागीतले. याबाबत झोला येथील ७० वर्षीय शेतकर्‍याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी येथील कार्यालयात दि. १० ऑगस्ट रोजी करत तलाठी यांना भेटणार असल्याचे तक्रारीत नमूद करून तलाठी यांनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार केल्याने मंगळवार ११ ऑगस्ट रोजी या तक्रारीची पडताळणी जुने तहसील कार्यालय येथे केली असता तलाठी रमेश लटपटे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचा फेर ओढण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तेंव्हा गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सापळा कारवाईच्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांची भेट घेतली असता तलाठी लटपटे यांना माझा संशय आला आहे.

ते माझ्याकडून मागणी केल्याप्रमाणे लाच स्वीकारणार नाहीत याची मला खात्री झाल्याचे व यापुढे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पुढील कार्यवाही करावी असा लेखी जबाब तक्रारदारांनी सादर केल्यामुळे लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पवार यांनी शनिवार १५ ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील पोलीस उप अधिक्षक महेश पाटणकर हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उप अधिक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पवार, सपोउपनि चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह. सीमा चाटे, पोकॉ. कल्याण नागरगोजे, पोकॉ. राम घुले, पोकॉ. शेख जिब्राहील, पोकॉ. बोधनकर, चापोकॉ. अनिल नरवाडे यांच्या पथकाने केली आहे.

शंका येताच तलाठी फरार
वाटणी फेर घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तक्रारदार शेतकर्‍यावर शंका येताच तलाठी रमेश लटपटे यांनी तक्रारदार शेतकर्‍याचा फोन उचलला नाही व फरार झाल्याची चर्चा होतं असुन लाच लुचपत विभागाने केलेल्या या कारवाईमुळे तलाठी वर्गासह महसूल प्रशासनातील अन्य अधिकारी तसेच कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.