Parbhani cow-riding gang: गंगाखेड शहरात गाईंना गुंगीचा इंजेक्शन देत इनोव्हा कारमध्ये जनावरांना पळविणारी टोळी सक्रिय झाली. चार दिवसात दोन घटनेत गाईंना बेशुद्ध
इनोव्हा कारमध्ये टाकून गंगाखेड शहरातून गाय पळविली..?
चार दिवसातील दुसरी घटना
परभणी (Parbhani cow-riding gang) : गंगाखेड शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या गायी व वासरू आदी जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन इनोव्हा कारमध्ये टाकून जनावरे पळविणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याचे गेल्या चार दिवसात घडलेल्या दुसऱ्या घटनेतून समोर आले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की शहरातील संत जनाबाई मंदिर रोड नरवाडे कॉर्नर येथे गेल्या शनिवारी १६ मे रोजीच्या पहाटे अंदाजे ३ वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चार इसमांनी तीन गाईनां गुंगीचे इंजेकशन देऊन बेशुद्ध करून एक गाय वाहनात टाकली. रात्रीच्या वेळी जागे झालेल्या एका इसमाने हे पाहून आरडाओरडा केला असता चार चाकी वाहनातून आलेल्या गो तस्करांनी बेशुद्ध अवस्थेतील दोन गाई जागीच सोडून वाहनासह पळ काढला.
या (Parbhani cow-riding gang) घटनेमूके गो रक्षक म्हणून काम करणारे विठ्ठल विलासराव शिंदे व उत्तम गायकवाड हे दोघे बुधवार २० मे रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास शहरात फेरफटका मारीत मन्नाथ नगर येथून महात्मा फुले नगर पाटी मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येत असतांना त्यांना महात्मा फुले नगर पाटीजवळ पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार उभी दिसली व चार अनोळखी इसम एक लहान गाय कार मध्ये टाकतांना दिसले तेंव्हा त्यांनी आवाज दिला असता कार तेथून भरधाव वेगात निघाली तेंव्हा त्या कारचा पाठलाग करून सुद्धा कार सापडली नाही.
परळीच्या दिशेने निघून गेल्याने विठ्ठल शिंदे यांनी डायल ११२ वर पोलिसांना माहिती देत महात्मा फुले पाटीजवळ जाऊन पाहणी केली असता एक गाय बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने पशु वैद्यकीय चिकित्सक अजय कठाळे यांना बोलावून बेशुद्ध गायीवर (Parbhani cow-riding gang) उपचार करून गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुंगीचे इंजेकशन देऊन गाय पळविणाऱ्या चार अज्ञात इसमाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोह संतोष मोहाळे हे करीत आहे. शनिवार १६ मे ते बुधवार २० मे दरम्यान ४ दिवसाच्या कालावधीत गाय पळविण्याच्या दोन घटना घडल्याने गाय व वासरू आदी जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन इनोव्हा कारमध्ये टाकून जनावरे पळविणारी टोळी गंगाखेड शहरात सक्रिय झाल्याचे बोलल्या जात असुन यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केल्या जात आहे.