Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड शहरातील कामठा येथील जुगाराच्या प्रशिक्षण केंद्राचा भांडाफोड

शहरानजीक, गाडेगाव मार्गावरील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार प्रशिक्षण केंद्राचा पोलिस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने २७ मार्च रोजी धाड टाकून भांडाफोड केला.


नांदेड शहरातील कामठा येथील जुगाराच्या प्रशिक्षण केंद्राचा भांडाफोड 

Gambling Racket Busted |

आयजींच्या पथकाच्या कारवाई 41 आरोपींविरुद्ध गुन्हा , 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (Gambling Racket Busted) : शहरानजीक, गाडेगाव मार्गावरील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार प्रशिक्षण केंद्राचा पोलिस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने २७ मार्च रोजी धाड टाकून भांडाफोड केला. या कारवाईत ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून मोबाईल, मोटारसायकल व ईतर साहित्य असा एकूण ११ लाख ४७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना कामठा गावात जुगार अड्डा सुरू असल्याची हेल्पलाईनवरून माहिती मिळाली. या माहितीवरून  त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक पथक हद्दीत रवाना केले .सदर माहितीवरून 27 मार्च रोजी पथकाने गाडेगाव मार्गावरील कामठा परिसरात जगनलाल  यादव यांच्या मालकीच्या जागेत एका टिन शेडमध्ये पपलू नावाचा जुगार खेळणाऱ्या 41 इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून नगदी रक्कम 1 लाख 50 हजार 950 रुपये, 37 मोबाईल व 12 मोटर सायकल असा एकूण 11 लाख 47 हजार 950  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांच्याविरुध्द  विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास  सपोनि संतोष जोंधळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सदर कारवाईत पोउपनि  पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदिप खानसोळे,  संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व  कामाजी गवळी यांचा सहभाग होता. जुगाऱ्यांना प्रशिक्षण देणारे केंद्र उपलब्ध कागदपत्रांप्रमाणे, कामठा येथील सदर जुगार अड्ड्यावर जुगाऱ्यांना जुगार खेळण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. सदर प्रशिक्षण केंद्र हे 'राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ', चिंचवडगांव, ता. वडवणी, जिल्हा बीड यांच्यामार्फत चालविण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात विशेष पथकाने केलेल्या कारवाईत, येथील जुगार अड्डड्यावर 41 आरोपी, पपलू नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

चिंचवडगाव येथील सदर क्रीडा व सांस्कृतिक मंडळांने परिक्षेत्रात अनेक ठिकाणी, अशा प्रकारची 'जुगार प्रशिक्षण केंद्रे सुरू केल्याची माहिती असून, यापूर्वी परभणी जिल्ह्यातील मौजे लिमला, ता. पूर्णा व मर्डसगाव, ता. गंगाखेड येथील प्रशिक्षण केंद्रांवर धाड टाकून, विशेष पथकाने अनेक जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Related to this topic: