स्थानिक पोलीस पथकाने सोमवारी उशिरा आखाडा बाळापूर ते येरीकेशन जाणाऱ्या रस्त्यावरील एका बारच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
१ लाख १० हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आखाडा बाळापूर : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस पथकाने सोमवारी उशिरा आखाडा बाळापूर ते येरीकेशन जाणाऱ्या रस्त्यावरील एका बारच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत मोबाईल, रोख रक्कम आणि जुगार साहित्य असा १ लाख १० हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच २० जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी १९ आरोपी मुद्देमालासह आढळून आले, तर एक आरोपी पसार झाला, अशी माहिती छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे भुजंग कोकरे, हरिभाऊ गुंजकर, चालक हराळ तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बिट प्रमुख गजानन राठोड, परमेश्वर सरकटे आणि चालक प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हरिभाऊ गुंजकर यांच्या फिर्यादीवरून शेख मुनीर शेख अमीर, निखिल सुभाष बंडेवार, शेख सलमान शेख गफार, कैलास वैजनाथ क्षीरसागर, सुनील शिवराम पोटे, मजहर लतीफ शेख, शेख जाकेर शेख युसुफ, सुरेश राजू भडंगे, राजेश नागोराव पाटेकर, साजीद मुनीर खा पठाण, गणेश प्रताप पवार, ऋषिकेश चांदेश्वर उपरे, कपिल कोंडबाराव सारेवार, अनिल संभाजी काशिदे, अविनाश देवीदास बोंढारे, हरूण इसाक सय्यद, भारत रमाजी पाईकराव, भगवान विलास बोंढारे, इरफान जमील कुरेशी आणि शेख सलीम शेख वलीसाब या २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख गजानन राठोड करीत आहेत.