Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

गादेगावातील पाणी टंचाईवरून ठिय्या आंदोलन!

मानोरा तालुक्यातील गादेगाव येथे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवरून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले.


गादेगावातील पाणी टंचाईवरून ठिय्या आंदोलन

Gadgaon Water Problem |

८ दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन!  

मानोरा (Gadgaon Water Problem) :
मानोरा तालुक्यातील गादेगाव येथे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या गंभीर समस्येवरून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडले. दि. १ मे रोजी सुदाम भिका जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

गादेगाव येथील नागरिकांना तसेच स्वतःच्या घरातही पाणीपुरवठा होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत पुढील ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ग्रामपंचायत सचिवांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

ग्रामपंचायत सचिवांना योग्य कार्यवाहीचे आदेश!   

गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांनी दि. ३० एप्रिलच्या पत्रान्वये ग्रामपंचायत गादेगावच्या सचिवांना या प्रकरणी तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आंदोलक सुदाम जाधव यांना कळविण्यात आले की, ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या योजनेंतर्गत पुढील ८ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

आंदोलन मागे घेऊन पंचायत समितीaला सहकार्य करावे, अशी विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कार्यवाही न झाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, गादेगाव तांड्यावर तीन पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर पाणी प्रश्न सुटण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Related to this topic: