MLA Dr. Milind Narote: गडचिरोलीतील आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी रविवार संध्यावेळी गावातील कार्यकर्त्यांशी संवाद व सदिच्छा भेट करून स्थानीय समस्यांचे उपचारसाठी मार्गधारक भूमिका बजावली.
MLA Dr. Milind Narote |
घोट परिसरातील कार्यकर्त्यांशी संवाद व सदिच्छा भेट...
घोट (MLA Dr. Milind Narote) : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी रविवारी (दि. १४ जून) चामोर्शी तालुक्यातील विविध गावांना भेट देत भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच जुन्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दौऱ्याची सुरुवात घोट येथून झाली. येथे त्यांनी ऋषिजी कोडापे व विलास गण्यारपवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर विलास उईके यांच्या निवासस्थानी आयोजित भाजपा कार्यकर्ता बैठकीत सहभागी होत संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर ठाकूरनगर येथील कृष्ण मंदिर परिसरात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पक्षविस्तार, बूथस्तरीय संघटन बळकटीकरण आणि आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.सोमनपूर येथे मारुती मडावी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर वसंतपूर येथे प्रफुल हलदर, गोर मंडल व तपन सरकार यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. आनंदग्राम येथे फणी भूषण मंडल यांच्या निवासस्थानी भाजपा कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली. तसेच सुभाषग्राम येथे आकुली दीदी विश्वास व सतीशजी रॉय यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दौऱ्यादरम्यान नागरिकांनी रस्ते,पाणीपुरवठा, इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी संबंधित प्रश्न शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याचे आश्वासन दिले.
या (MLA Dr. Milind Narote) दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेडीवार,संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ सय्यद,मधुकर भांडेकर,पोहणकर, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हलधर, भाजपा आदिवासी आघाडी प्रमुख विलास उईके,माजी सरपंच सतीश रॉय,निरजन बाच्छाड, घोट सर्कल भाजपा तालुका अध्यक्ष राकेश सरकार,सुभाषग्रामचे सरपंच किष्णा मंडल, विश्वजीत बार, माजी पंचायत समिती उपसभापती अकुली विश्वास, गिरिश उपाध्ये, बबलू शहा, बंडू जुवारे, दिनकर लाकडे, साईनाथ नेवारे, संजय बुरांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपर्क, संवाद आणि संघटन बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आले.*