Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

समस्या सोडविण्यास शासन निष्क्रिय, काँगेसचे बजरंगबलीकडे साकडे

विविध समस्यांमुळे जिल्ह्यातील जनतेला मोठ्या  हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.


समस्या सोडविण्यास शासन निष्क्रिय काँगेसचे बजरंगबलीकडे साकडे

Gadchiroli Issues |

सेमाना मंदिरात हनुमान चालीसा पठण

गडचिरोली (Gadchiroli Issues) : विविध समस्यांमुळे जिल्ह्यातील जनतेला मोठ्या  हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे व जड वाहतुकीमुळे दिवसागणिक अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील सुपीक जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात आहे.  अशा अनेक समस्या असतांना  पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला पोरके केले आहे. जनतेच्या रक्षणासाठी  देवाभाऊंनी लक्ष घालावे, याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सेमाना मंदिर देवस्थान येथे भव्य हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

यावेळी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड . विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, परसराम टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, हरबाजी मोरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, सुमेध तुरे, दिवाकर निसार, नंदू वाईलकर, अनिल कोठारे, विनोद लेंगुरे, नितीन राऊत, दिलीप घोडाम, महादेव भोयर, उत्तम ठाकरे, सुधीर बांबोळे, अब्दुल पंजवानी, राजेश ठाकूर, श्रीनिवास ताडपल्लीवार, संजय चन्ने, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, विजय लाड, निकेश कामिडवार, चोखाजी बांबोळे, नदीम नाथानी, योगेंद्र झंजाड, दुधराम भोयर, प्रफुल बारसागडे, लक्ष्मण मेश्राम, सौ. कविता भगत, सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. रिता गोवर्धन, सौ. वृंदाताई गजबे, सौ. शेवंता हलामी, सौ. दीपिका उसेंडी, सौ. अनिता डोईजड, सौ. आरती कंगाले, सौ. शालिनी पेंदाम, सौ. पल्लवी बांबोडे, सौ. पुष्पा चौधरी, सौ. सुमन उंदीरवाडे सह इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या आहेत समस्या

दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे; अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करू नये, शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक रानटी हत्ती व इतर वन्य प्राण्यांकडून पूर्णतः उद्ध्वस्त केले जात आहे. वन्य प्राण्यांचा  बंदोबस्त करण्यात यावा,जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे; पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची व आरोग्य व्यवस्थेची दुरुस्ती करण्यात यावी, आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व इतर स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावे, लोकांच्या हाताला पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे; स्थानिक सुरजागड कोणसरी प्रकल्पात व इतर कोणत्याही नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांत जिल्ह्यातील स्थानिक युवकांना 80% जागा देण्यात याव्यात, जिल्ह्यातील बहुसंख्य दवाखाने, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून त्यामुळे जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत; सदर रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी. लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा मिळत नाही; नियमित वीजपुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वनपट्ट्यांचे दावे प्रलंबित असून ते तातडीने निकाली काढण्यात यावेत. शालेय विद्यार्थ्यांकरिता व सामान्य नागरिकांकरिता अतिरिक्त बससेवा वाढविण्यात यावी.जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत.

Related to this topic: