Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

ई-बसला आग

गडचिरोली-चंद्रपूर ई-बसला भीषण आग; सामान जळून खाक

Gadchiroli E-bus Fire: गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ई-बसला आग लागून प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. सर्व ४० प्रवासी सुरक्षितपणे बसमधून बाहेर पडले, जीवितहानी टळली.


गडचिरोली-चंद्रपूर ई-बसला भीषण आग सामान जळून खाक

Gadchiroli E-bus Fire |

 

४० प्रवासी सुखरूप

गडचिरोली (Gadchiroli E-bus Fire) : गडचिरोलीवरून Chandrapur येथे जाणाऱ्या चंद्रपूर आगाराच्या ई-बसला शनिवारी (दि. ९ मे) दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील सर्व ४० प्रवासी वेळेत खाली उतरल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रवाशांचे सामान आणि बॅगा आगीत जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीवरून दुपारी साडेतीन वाजता निघालेली इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी (Gadchiroli E-bus Fire) ई-बस चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान, लोहार्‍या परिसरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास बसमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला.

आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, काही वेळातच संपूर्ण बस ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रसंगावधान राखत चालक व प्रवाशांनी तत्काळ बस खाली केल्याने सर्वांचे प्राण वाचले. मात्र प्रवाशांच्या बॅगा, कागदपत्रे आणि इतर साहित्य आगीत जळून खाक झाले.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग एवढी भीषण (Gadchiroli E-bus Fire) होती की बसचा क्रमांकही ओळखता येत नव्हता. घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बस आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगण्यात आले.

Related to this topic: