PM Jeevanjyoti Bima Yojana: गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दोन मृतक ग्राहकांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे धनादेश सुपुर्त करण्यात आले.
घोट परिसरातील बँक ग्राहकांनी विमा योजनेचे लाभ घेण्याचे शाखा व्यवस्थापक चिंचोलकर यांचे आवाहन
घोट (PM Jeevanjyoti Bima Yojana) : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा घोटच्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाअंतर्गत 2 मृतक व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपयांच्या विमा रक्कमेच्या धनादेश सुर्पुत करण्यात आला.मृतक सविता मांडवकर रा घोट याच्या मुलगा प्रशांत मांडवकर व मय्यत चंद्रकला वसंत कुलेटी रा.राजुर (बु) वारसदाराचे पती वसंत कुलेटी यांना धनादेश सुपूत करण्यात आले सदर मृतक व्यक्तीच्या नावे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा घोट येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत विमा काढलेला होता.

या (PM Jeevanjyoti Bima Yojana) दोघांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेचे वतीने त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करून कमी कालावधीत लाभार्थी यांना विमा लाभाचे धनादेश यांना सुपूर्त करण्यात आला.यावेळी घोटचे शाखा व्यवस्थापक डी.जे चिंचोलकर,पत्रकार हेमंत उपाध्ये,बँक निरीक्षक एन सुंकरवार,सुधीर देवतळे,एन टी गेडाम,बी एन वानखेडे,एस एच रामटेके,किशोर पातेवार आदी होते.तसेच बँकेच्या प्रत्येक खातेदारांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा काढून लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे शाखाव्यवस्थापक डि जे चिंचोलकर यांनी केले आहे.
अल्प दरात विमा.. सर्वसामान्यासाठी दिलासा..
सर्व सामान्य गोरगरीब नागरिक मोठ्या रकमेच्या विमा काढू शकत नाही. मात्र केंद्र शासनाचा वार्षिक 436 आणि 20 वीस रुपयाच्या (PM Jeevanjyoti Bima Yojana) विमा रकमेच्या कपातीवर दोन लाखापर्यंत विमा सहज उपलब्ध असल्याने सर्वसामान्य नागरिकांना विमा योजनेचा लाभ होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.