Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन

शहरात पेट्रोल तुटवड्याच्या अफवांदरम्यान नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.


अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन

Fuel Stock |

नागपुरात साठा पुरेसा, घाबरू नका – प्रशासन

नागपूर (Fuel Stock) :  शहरात पेट्रोल तुटवड्याच्या अफवांदरम्यान नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी नागपुरात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले.

गेल्या काही तासांत काही पेट्रोल पंपांवर दिसून आलेली गर्दी ही अफवांमुळे झालेली पॅनिक बायिंग असल्याचे प्रशासनाने नमूद केले. नागरिकांनी घाबरून पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करत सर्व आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. तसेच पेट्रोल पुरवठा सुरळीत सुरू असून, क्रेडिट लिमिट संदर्भात कोणतीही अडचण नसल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, इंडस्ट्रीसाठी सुमारे ५० टक्के निर्बंध लागू करण्यात आले असले तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

सध्या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी यंत्रणा सतत कार्यरत आहे.

Related to this topic: