Farmer Child Free Education: भारतीय जैन संघटना हिंगोलीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना (5वी ते 7वी) व नंतर 12वी पर्यंत विनामूल्य शिक्षण देण्याचा संवेदनशील उपक्रम
हिंगोली (Farmer Child Free Education) : भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अत्यंत संवेदनशील उपक्रम राबवला जात आहे. संस्थापक अध्यक्ष मा. शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. या उपक्रमांतर्गत पुणे येथील वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून निवास, भोजन, कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच इतर सर्व आवश्यक सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील इयत्ता 5 वी, 6 वी व 7 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींना या (Farmer Child Free Education) उपक्रमांतर्गत प्रवेश दिला जात आहे. या विद्यार्थ्यांचे 12 वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण भारतीय जैन संघटनेमार्फत विनामूल्य केले जाणार आहे. यासाठी बीजेएसची टीम सध्या हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली असून त्यांनी औंढा नागनाथ, हिंगोली व कळमनुरी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पात्र मुला-मुलींचे प्रवेश निश्चित केले आहेत.
या कामी हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी प्रकाश सोनी हिंगोली 9422176610, तेजकुमार झांजरी औंढा 9011328932, अतुल बुरसे कळमनुरी 9403807514, पारस जैन वसमत 8408031111 व हेमंत संघई सेनगाव 9637638999 हे कार्यरत आहेत. तसेच वाघोली पुणे विद्यालयातील प्रा. प्रदीप आव्हाड 8329928675 व प्रा. उमाशंकर धुमनसुरे 7378993944 हे सुद्धा प्रवेश प्रक्रियेत सहभागी आहेत.
उर्वरित ज्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना (Farmer Child Free Education) प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी 2 जून 2026 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.