जबाबदार अधिकाऱ्यांना व आमदारांना शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर!
व्यापाऱ्याकडून ज्वारी उत्पादकशेतकऱ्यांची लूट
शासकीय खरेदी केंद्र तात्काळचालू करण्याची मागणी
दत्तात्रय भटकर
बार्शीटाकळी (MLA Amol Mitkari) : शेतकऱ्यांच्या हितासाठी, राज्य सरकारने दिनांक एक मे पासून नाफेड अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिल्यानंतरही खरेदी केंद्र चालू झाले नाहीत. अशातच माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या संशयास्पद पत्रामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट निर्माण झाली असून तात्काळ खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड मुंबई चे सर व्यवस्थापकीय संचालक डीआर भोकरे यांनी दिनांक सात नोव्हेंबर 2025 ला राज्यातील नाफेड व इतर सर्व शासकीय ज्वारी खरेदी करणाऱ्या केंद्रव व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सन 2025 2026 अंतर्गत दिनांक 1 मे 2026 ते 30 जून 2024 पर्यंत प्रति क्विंटल 99 रुपये दरानेज्वारी खरेदी केंद्र चालू करण्याचे लेखी स्वरुपात आदेश दिले होते. ज्वारी विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्याप्रमाणेच बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बार्शीटाकळी तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी समिती अंतर्गत दिनांक 15 एप्रिल पासूनज्वारी नोंदणी करिता अर्ज सादर केले होते. परंतु दिनांक 14 मे पर्यंत सदर खरेदी केंद्र चालू झाले नाही.
जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे दिनांक 4 एप्रिल 2026 ला बार्शीटाकळी तालुक्यातील गणेश पंजाबराव महल्ले, खेरडा भागाई, राहुल चंद्रभूषण जयस्वाल व शिवचरण सखाराम केदार, (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी) रा. पिंजर, हर्षल रामदास महल्ले सेलू खु. व आशिष गजानन मालठाणे रा.कानशिवनी तालुका जिल्हा अकोला. यांनी केलेल्या तक्रारीतून बार्शीटाकळी तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारीचे पीक व सातबारा उतारा वर ज्वारीचा पीक पेरा नसताना अनेकांनी अवैधरित्या ज्वारी विक्री करण्याकरिता नोंदणी केली असून सदर नोंदणीची तपासणी करून नोंदण्या रद्द कराव्यात. अशा प्रकारची मागणी केली होती.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे सदस्य तथा. महाराष्ट्र राज्य. विधान परिषद विधिमंडळाचे तत्कालीन आमदार तथा विद्यमान माजी आमदार अमोल दादा मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिनांक आठमेला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना दिलेल्या तक्रारीतून ,वार्षिक खरेदी विक्री मध्ये ज्वारी हमीभाव नोंदणी 2025 26 मध्ये झालेल्या कथित गैरप्रकारची चौकशी करून अवैध नोंदण्या रद्द करणे व ज्वारी खरेदी तात्काळ स्थगित करण्या बाबत सविस्तर पत्र दिले आहे. सदर पत्रातून ज्वारी हमीभाव नोंदणी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गाकडून प्राप्त होत आहेत, त्यामुळे खरी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निपक्ष चौकशी होईपर्यंत अकोला जिल्ह्यातील तिवारी हमीभाव खरेदी प्रक्रिया तात्काळ स्थगिती करण्यात यावी. जेणेकरून पुढील गैरप्रकार होणार नाही व शासनाची फसवणूक टाळता येईल असे सदर तक्रारी म्हटले असून, सदर पत्रात शेतकऱ्यांनीदिलेल्या तक्रारीचा संदर्भ देण्यात आला नाही.
त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडच्याज्वारी विक्री केंद्रावर ज्वारी विक्री करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच दुसरीकडे खाजगी व्यापारी हे 2300 ते 26 ते 50 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याकडून ज्वारी खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
वास्तविक पाहता सरकारच्या शासकीय ज्वारी खरेदी केंद्राकडून ज्वारी विक्रीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यां कडून ज्वारी खरेदी करण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज किंवा संदेश पाठवून ज्वारी खरेदी केंद्र चालू करणे आवश्यक व बंधनकारक होते .परंतु तसे झाले नाही. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी सुद्धा वेळेवर ज्वारी खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिले असूनही अद्याप पर्यंत ज्वारी खरेदी केंद्र चालू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.दिनांक 25 मे पासून पावसाळ्याचे दिवस चालू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील मशागतीची तसेच पेरणी संदर्भात काम करण्यासाठी ज्वारी विक्री केली नसल्याने पैसाच उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने शेतकऱ्या त संतापाची लाट निर्माण झाल्याची गंभीर व विदारक परिस्थिती समोर आली आहे.
बार्शी टाकळी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी बार्शीटाकळी तहसीलदार श्री कापशीकर यांच्याकडे दिनांक 14 मे ला तालुक्यातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ चालू करण्यात यावे, जेणेकरून शेतातील मशागतीची कामे, खाजगी व्यापाऱ्याकडून होत असलेली लूट व खरिपाची पेरणी करण्याकरिता पैसा उपलब्ध नसल्याने तात्काळ ज्वारी खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीचा मोबदला देण्यात येऊन शेतकऱ्यावर होत असलेला अन्यायदूर करण्याची मागणी टाकळी छबिले येथील शेतकरी संतोष छबिले व इतर अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. केली आहे.
अधिकारी व आमदारांना शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर!
ज्वारी विक्रीकरिता नोंदणी केली आहे. परंतु ज्वारी खरेदी केंद्र चालू झाली नसल्याने ज्वारीची विक्री करता आली नाही. तसेच शेतातील मशागतीचे कामे, व खरिपातील पेरणीचे नियोजन व कुटुंबातील अडचणी सोडविण्याकरिता पैसा उपलब्ध नसल्याने कमालीची अडचण निर्माण झाली आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी जिल्ह्यातील गैर प्रकाराची चौकशी झाल्याशिवाय ज्वारी खरेदी केंद्र बंद ठेवावीत अशा प्रकारचे संशयास्पद शेतकऱ्यांना अडचणी करणारे पत्र देण्याची गरज नव्हती. एक मे पासून खरेदी केंद्र चालू करणे आवश्यक होते परंतु जबाबदार अधिकारी व आमदार मिटकरी यांना शेतकऱ्यांच्या दुःखाचा विसर पडला आहे, असे मत संतोष छबिले व इतर शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केले. वृत्तल लिहेपर्यंत आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बार्शीटाकळी तालुक्यातील व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीटाकळी दिलेल्या परवान्यानुसार सदर व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीटाकळी व उपबाजार पिंजर च्या आवारात शेतकऱ्याकडून मालाची खरेदी करणे आवश्यक व बंधनकारक आहे. परंतु तसे होताना दिसत नसून अनेक व्यापारी अनेक खेड्यातून कमी भावात शेतकऱ्याकडून माल खरेदी करत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला व्यापाऱ्याकडून मिळणारा कर बुडतो त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचेव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार खाजगी व्यापारी एकदम कमी भावात शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या परवाना तात्काळ रद्द करण्याची गरज निर्माण झाली असून अशा प्रकारची तक्रार एका व्यक्तीने सहाय्यक निबंधक बार्शीटाकळी व वरिष्ठाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.