Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

वनक्षेत्रात वनव पेटविण्यार्‍या विरूध्द कुनघाडा रै वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही

अग्निरक्षक वनगस्तीवर असतांना गणपूर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ११७ राखीव वनक्षेत्रात काशिपूर येथील आरोपी भानुदास सोनूजी बुरले याला वनातील पाला-पाचोळा जमा करून आग लावत असतांना रंगेहात पकडण्यात आले.


वनक्षेत्रात वनव पेटविण्यार्‍या विरूध्द कुनघाडा रै वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही

आरोपीस अटक

कुनघाडा रै (Forest Fire) : २९ मार्च रोजी नवेगांव नियतक्षेत्राचे वनरक्षक तथा अग्निरक्षक वनगस्तीवर असतांना गणपूर नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ११७ राखीव वनक्षेत्रात काशिपूर येथील आरोपी भानुदास सोनूजी बुरले याला वनातील पाला-पाचोळा जमा करून आग लावत असतांना रंगेहात पकडण्यात आले.

त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, कुनघाडा व क्षेत्रसहाय्यक कुनघाडा यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी  मधूमती तावाडे, क्षेत्र सहाय्यक एच. जी. झोडगे, वनरक्षक तथा अग्निरक्षक   एच. एम. मडामे यांनी घटना स्थळावर जावून पाहणी केली असता आगीचे रोद्ररूप दिसून आले. प्रथम ब्लोअर मशिन व झाडाच्या फाद्यांनी आग विझविण्यात आली आणि आरोपी भानुदास सोनूजी बुरले रा. काशिपूर  याला चौकशी कामी ताब्यात घेवून वनकोठडी नंतर अधिक चौकशी करण्यात आली .त्यात  त्याने वनक्षेत्रातील मोहा फुले गोळा करण्याचे दृष्टीने मोहा झाडा खालील जागा साफ करण्याकरीता  आग लावल्याचे कबूल केले.

त्यावरून त्याच्या विरूध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( १ ) ब, ड  व कलम ५२ वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजताचे सुमारास घटनास्थळी जावून आरोपी यांनी सदर वनगुन्ह्यात वापरलेली आगपेटी, सायकल व अंदाजे ५ किलो मोह फुलांनी भरलेली चुंगडी घटनास्थळावर जप्त करून जप्तीनामा व मौका पंचनामा नोंदविण्यात आला . जळीत क्षेत्राचा जी पी एस पोलिगोन घेण्यात आले त्यात १.९८ हे. आर. क्षेत्र जळून वनक्षेत्रातील वनाची, भुपृष्टावरील पाला-पाचोळा, किटक इत्यादी जळून नष्ट झाले असल्याने दिसून आले.

त्यानंतर आरोपीस वनकोठडी कुनघाडा येथे आणून आरोपीची अधिक चौकशी करून आरोपीचे बयाण नोंदविण्यात आले. आणि ३० रोजी आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि  प्रथम श्रेणी न्यायालय, गडचिरोली येथे हजर करून, आरोपीस जमानत न-देता  दिनांक ३० मार्च ते १२ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळणे बाबत एम.सी.आर. दाखल करण्यात आले. ही सर्व कार्यवाही उपवनसंरक्षक आर्या , सहाय्यक वनसंरक्षक प्रविण  पाटील  यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास सुरू असून सदर कार्यवाही करीता क्षेत्र सहाय्यक एच. जी. झोडगे, वनरक्षक  एन. व्हि. वाडगुरे, वनरक्षक  एच. एम. मडामे, वनरक्षक ए. एम. टेकाम, वनमजूर अमिष खोब्रागडे वनमजूर, वाहन चालक मुकेश हजारे तसेच सर्व वनकर्मचारी,  वनमुजूर यांनी मोलाची भुमिका पार पाडली.

Related to this topic: