Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नैसर्गिक रसास्वाद

असा उतरतो पोटामध्ये गोडवा...नैसर्गिक रसास्वादासाठी नागरिकांची पाऊले रसवंत्याकडे!

Sugarcane juice: शरीराला थंडावा मिळविण्यासाठी उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचा कल


असा उतरतो पोटामध्ये गोडवानैसर्गिक रसास्वादासाठी नागरिकांची पाऊले रसवंत्याकडे

Sugarcane juice |

लातूर (Sugarcane juice) : लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला असतानाच शरीराला थंडावा मिळविण्यासाठी उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कृत्रिम व रासायनिक पदार्थांचे मिश्रण करून तयार केलेल्या शीतपेयांपेक्षा उसाचा रस हा मुळातच नैसर्गिक असल्याने त्याचा गोडवा घेण्यासाठी नागरिकांची पाऊले रसवंत्याकडे पडत आहेत. 

लातूर शहर व जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढता असून लोक उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. अनेक ठिकाणी उन्हापासून बचावासाठी शीतपेय विक्री होत आहे. मात्र लोकांमध्ये नैसर्गिक शीतपेयांबाबत कमालीची जागृती झाल्याचे आता दिसत आहे. त्यामुळे लिंबू पाणी, उसाचा रस, कैऱ्यांचे पन्हे, ताक, मठ्ठा, चिंचेचे पन्हे, कोकम रस, नारळ पाणी अशा (Sugarcane juice) रसग्रहणाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वात ताजेपणा असलेले व गोड असलेला रसास्वाद म्हणजे उसाचा रस होय. लातूर शहरात जवळपास दोन हजारावर रसवंत्या दररोज नागरिकांना उसाचा रस उपलब्ध करून देत आहेत. त्यातही अनेक रसवंती या फिरत्या रसवंत्या आहेत. मात्र एके ठिकाणी थांबून रसवंती चालविणारे अनेक कुटुंबे शहरामध्ये आहेत. 

लातूर शहरात राजीव गांधी चौक परिसरात औसा रोडवर सौ. जिजाबाई व भरत गोरे हे दांपत्य रसवंती चालवतात. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्या असल्याने उसाची टंचाई भासत आहे. उसाचे भाव आता पाच हजार रुपये प्रति टना पर्यंत गेले आहेत. त्यामुळे (Sugarcane juice) रसवंती चालकांना ग्राहकांना स्वस्तात रस देणे कठीण होत आहे. जवळपास 30-35 किलोमीटर परिसरातून लातूरमध्ये ऊस आणण्यासाठी रसवंती चालकांना वाहन भाडे खर्च सोसावा लागतो. स्वतः फळात ऊस तोडणी करून ऊस आणावा लागतो. त्यासाठी एक दिवस रसवंती बंद ठेवावी लागते. अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करीत रसवंती चालक आपल्या रोजगाराचा मेळ घालत आहेत. हा मेळ घालताना ग्राहकांना गोड ताजा रस देण्यावर त्यांचा अधिक भर दिसून येतो.

दहा रुपयांमध्ये रसाचा ग्लास!

लातूर शहर व परिसरात अनेक रसवंत्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर ही अनेक ठिकाणी रसवंती आहेत. अशा अनेक ठिकाणी लोकांना उसाचा ताजा रस १५ रुपये ग्लास, काही ठिकाणी तर २० रुपये ग्लास रस विक्री होत आहे. मात्र जिजाबाई व भरत हे दांपत्य केवळ दहा रुपयांमध्ये ग्लासभर रस उपलब्ध करून देत आहेत. विशेष म्हणजे या रसवंतीसाठी ते बर्फाचा वापर करत नाहीत, हे विशेष. 

चार हजार रुपये प्रति टन...

रसवंती चालक भरत गोरे यांना याबाबत बोलते केले असता ते म्हणाले की २०१० पासून आपण रसवंती (Sugarcane juice) चालवतो. यातून कुटुंबाची गुजराण होते. सध्या उसाची टंचाई आहे. आजच चार हजार रुपये प्रति टन या भावाने 671 जातीचा ऊस मिळाला. मात्र या उसाला गोडवा अधिक आणि रस कमी असल्याने एका उसामध्ये दोन-अडीच ग्लास रस निघतो. बासट हजार जातीचा ऊस असल्यानंतर त्यातून रस तीन ते चार ग्लास निघू शकतो. ऊस तोडून आणण्यापासून वाहनाचा खर्च व इंधनाचा खर्च जाता दररोज आपला रोजगार मिळतो, हे समजून ग्राहकांना केवळ दहा रुपयांमध्ये एक ग्लासभर रस देत असल्याचे ते म्हणाले.

Related to this topic: