मालेवाडा-धामणगाव विद्यामंदिर येथे दोन मे रोजी लागलेल्या आगीमध्ये येथील भीमराव ढोणे यांचा ऑटो पूर्णता जळून खाक झाला होता.
माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची धामणगाव येथे भेट
भिवापूर (Fire Victims Aid) : मालेवाडा-धामणगाव विद्यामंदिर येथे दोन मे रोजी लागलेल्या आगीमध्ये येथील भीमराव ढोणे यांचा ऑटो पूर्णता जळून खाक झाला होता. त्यामुळे ढोणे कुटुंबाची रोजी रोटी संकटात आली होती. मात्र आता मात्र आता ढोणे कुटुंबाला ऑटो घेण्यासाठी राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे या ऑटोचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासकीय मदतीतून घरांसाठी आणि काही सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होते. मात्र ढोणे कुटुंबाचा जीवन जगण्याचा आधार प्रवासी आटो पूर्णतः जळाल्याने ते चिंताग्रस्त होते. दरम्यान मंगळवारी 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी धामणगाव येथे भेट देऊन आग पिडीत कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला काही रोख रक्कम आणि ऑटो दुचाकी व रंगारी कुटुंबियांची जळालेला कांडप मशीन याकरिता त्यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत मदत देण्याची घोषणा केली. यामुळे शासकीय मदती व्यतिरिक्त ज्यांचे रोजी रोटी चे साहित्य जळाले होते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राजेंद्र मुळक यांच्या भेटीत गंगाधर रेवतकर, माजी जिल्हा परिषद शंकर डडमल, बाळू इंगोले, गंगाधर ठाकरे, गब्बर रेवतकर ,अशोक उमाक सुरेश शेंडे नंदा नारनवरे संजय देशमुख , रवी मलवंडे बालू नागेकर सरपंच वैशाली चौधरी नायब तहसीलदार प्रवीण राठोड, पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, आदी उपस्थित होते.