Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरीत उभ्या ट्रकला अचानक आग

कळमनुरी–हिंगोली–नांदेड मुख्य रस्त्यावर तोष्णीवाल मंगल कार्यालयासमोर असलेल्या एका सिमेंट दुकानात उभ्या असलेल्या ट्रकला 28 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.


कळमनुरीत उभ्या ट्रकला अचानक आग

Fire Incident |

कळमनुरी (Fire Incident) : कळमनुरी–हिंगोली–नांदेड मुख्य रस्त्यावर तोष्णीवाल मंगल कार्यालयासमोर असलेल्या एका सिमेंट दुकानात उभ्या असलेल्या ट्रकला 28 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग वाढत असल्याचे लक्षात येताच तत्काळ अग्निशामक दलाला फोन करून पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेतला. विनोद बांगर, राहुल इंगळे, जाधव, काळे, हारण आदींनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. वेळीच आग नियंत्रणात आल्यामुळे मोठे नुकसान टळले असले, तरी आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related to this topic: