Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

शेतकरी मोटर चोरी

नायणी येथील शेतकऱ्याच्या विहिरीवरील मोटर चोरीला; अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Farmer Motor Theft: नायणी येथील शेतकरी प्रमोद महल्ले यांच्या शेतातील विहिरीवर चोरी झालेल्या १ इंची विद्युत मोटरने पाण्याची व्यवस्था बंद करून जनावरांना गैरसोय होण्याची घटना रोजी दाखल झाली.


नायणी येथील शेतकऱ्याच्या विहिरीवरील मोटर चोरीला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Farmer Motor Theft |

 

मुक्या जनावरांसाठी बांधलेल्या हौदाचे पाणी झाले बंद

मानोरा (Farmer Motor Theft) : तालुक्यातील नायणी येथील शेतकरी प्रमोद एकनाथ महल्ले यांच्या शेतातील विहिरीवरील १ इंची विद्युत मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. ०४ जून २०२६ रोजी घडली असुन शेतकऱ्यांनी मानोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करीत आहे. 

 मौजे नायणी येथील शेतकरी प्रमोद महल्ले यांच्या  नायणी शिवारातील शेत सर्व्हे नं. ५३ मध्ये विहीर आहे. शेताच्या आजूबाजूच्या ५ कि.मी. परिसरात जंगलातील तसेच मोकाट जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच्या शेतात हौद बांधून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. परिसरात थ्री-फेज बंद असल्याने त्यांनी विहिरीवर १ इंची मोटर बसवली (Farmer Motor Theft) असुन दररोज नियमितपणे हौद भरत होते. दि. २७ मे ते दि. ३१ मे या कालावधीत ते अकोला येथे गेले असल्याने शेतात जाऊ शकले नाहीत.

दि. १ जून रोजी गावी परतल्यावर शेतात गेले असता विहिरीवरील १ इंची मोटर चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला परंतु मोटर मिळून आली नाही.  मुक्या जनावरांच्या पाण्याची सोय करणाऱ्या शेतकऱ्याच्या मोटरची चोरी झाल्याने हौदातील पाणी बंद झाले असून जनावरांची गैरसोय होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०३ (२) बीएनएस नुसार नोंद केली असून पुढील तपास बिट जमादार हे करीत आहेत. 

Related to this topic: