Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली दौऱ्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांना शेतकरी संघटनेचे निवेदन; शेतरस्ते, मोबदला व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

चिखली दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.


चिखली दौऱ्यावर महसूलमंत्री बावनकुळे यांना शेतकरी संघटनेचे निवेदन शेतरस्ते मोबदला व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

Farmers Issues |

चिखली (Farmers Issues) : चिखली दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले. शेतरस्ते, पांधन रस्ते, जमिनीचा मोबदला, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तसेच शेतकऱ्यांना डिझेल पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या 20 एप्रिल 2026 रोजी महसूल मंत्री चिखली मध्ये आले असता या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्य सरकारने शेतरस्ते खुले करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, यामुळे वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असलेले अनेक वाद मिटण्यास मदत झाली आहे. महसूल विभागामार्फत घेतलेल्या या शेतकरीहिताच्या निर्णयाबद्दल सरकारचे व महसूलमंत्री बावनकुळे यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन करण्यात आले.

मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अद्याप काही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत संघटनेने काही प्रमुख मागण्या मांडल्या. शेतरस्ते व पांधन रस्त्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वापरण्यात येत आहेत, त्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा तसेच संबंधित क्षेत्र सातबाऱ्यावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शासकीय मोजणी पूर्ण झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जमीन ताब्यात मिळविताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनिक पातळीवर सुधारणा करण्याची गरज आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

याशिवाय महसूल विभागामध्ये प्रलंबित असलेल्या शेती व शेतरस्त्याच्या केसेस तातडीने निकाली काढाव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर न्याय मिळेल, अशी मागणी करण्यात आली. वन्य प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शेतकऱ्यांना आरसी बुकवर कॅनमध्ये डिझेल देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. शासनाने या सर्व मागण्यांवर त्वरित तोडगा काढून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. या प्रसंगी देविदास कणखर (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना), समाधान कणखर, मुरली महाराज येवले, विठ्ठल गुरुजी सोळंकी, आत्माराम पाटील, राजू शेटे आदी उपस्थित होते.


 

Related to this topic: