Farmer Bullock fell: तालुक्यातील घोरदडी येथे पेरणीपूर्व मशागतीचे काम सुरू असताना एका शेतकऱ्याची बैलगाडी आणि दोन्ही बैल तब्बल ६० फूट खोल विहिरीत कोसळल्याची थरारक घटना मंगळवारी दि. २ जून दुपारी घडली.
ग्रामस्थांच्या धाडसाने वाचले जीव; घोरदडीतील थरारक घटना
पेरणीपूर्व मशागतीदरम्यान घडला अपघात, बैलांना दुखापत
सेनगाव (Farmer Bullock fell) : तालुक्यातील घोरदडी येथे पेरणीपूर्व मशागतीचे काम सुरू असताना एका शेतकऱ्याची बैलगाडी आणि दोन्ही बैल तब्बल ६० फूट खोल विहिरीत कोसळल्याची थरारक घटना मंगळवारी दि. २ जून दुपारी घडली. मात्र, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, घोरदडी येथील शेतकरी दत्तात्रेय आश्रुबा जवादे हे आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे करत होते. यावेळी अचानक बैलगाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बैलांसह गाडी जवळील ६० फूट खोल विहिरीत कोसळली. (Farmer Bullock fell) घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. या (Farmer Bullock fell) घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूच्या शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता काही तरुण आणि शेतकरी विहिरीत उतरले. त्यांनी प्रथम बैलांना गाडीपासून मोकळे केले आणि त्यानंतर दोरखंड व अन्य साधनांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही बैलांना सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले.
अपघातात बैलांना गंभीर दुखापत झाली नसली तरी मुक्कामार लागल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत साखरा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला असून, संबंधित डॉक्टर बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन बैलांची तपासणी करणार असल्याची माहिती शेतकरी दत्तात्रेय जवादे यांनी दिली. या (Farmer Bullock fell) घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी उघड्या व संरक्षक कठडे नसलेल्या विहिरी शेतकऱ्यांसाठी किती धोकादायक ठरू शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. ग्रामस्थांनी अशा विहिरींना संरक्षक जाळी किंवा कठडे उभारण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांची तत्परता ठरली जीवदान घटनेची माहिती मिळताच गावातील शेतकरी (Farmer Bullock fell) आणि युवकांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. विहिरीत उतरून बैलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केलेल्या धाडसी प्रयत्नांचे परिसरात कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.