Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा - विजय वडेट्टीवार

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.


कर्जमाफी फसवी शेतकऱ्यांचा ७१२ कोरा करा - विजय वडेट्टीवार

Farm Loan Waiver |

राज्यात नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचा आरोप

नागपूर (Farm Loan Waiver): सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांचा /१२ कोरा केल्याशिवाय कर्जमाफीचा खरा फायदा होणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहते. त्यामुळे भविष्यात नवीन कर्ज मिळवताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचा फायदा होत असून, शेतकरी मात्र मदतीपासून वंचितच राहत असल्याची टीका त्यांनी केली.

राजकारणातील नैतिकता संपुष्टात

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून, राजकारणातील नैतिकता संपुष्टात आली आहे. 'आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे हीच आता फॅशन झाली आहे,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली

सत्ताधारी गोटात सर्व काही सुरळीत नसल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला. राज्य कर्जबाजारी होत असताना सत्तेसाठी खेळ सुरू असून, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. विकास निधी वाटप करताना सर्वांना समान न्याय मिळणे आवश्यक असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी देणे ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचे ते म्हणाले.

 

Related to this topic: