Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित

राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित

Encroachment Regularization |

चिखली तहसीलदार विजय सवडे यांचे पात्र नागरिकांना आवाहन; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्जाची मुदत

चिखली (Encroachment Regularization) : राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे ठराविक अटी व शर्तींनुसार नियमित करण्यात येणार आहेत. चिखलीचे तहसीलदार विजय सवडे यांनी तालुक्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 योजनेच्या प्रमुख तरतुदी आणि अटी :

  • निवासी प्रयोजन: केवळ राहण्यासाठी केलेली अतिक्रमणेच नियमित केली जातील. व्यावसायिक बांधकामे अपात्र राहतील.
  • क्षेत्रफळ व शुल्क:
    • ५०० चौ. फुटांपर्यंत: पूर्णपणे मोफत.
    • ५०० ते १५०० चौ. फुटांपर्यंत: पहिल्या ५०० चौ. फुटांनंतरच्या जास्तीच्या क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या १०% शुल्क आकारले जाईल.
    • मर्यादा: १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त अतिक्रमण नियमित न करता निष्कासित करण्यात येईल.
  • कुटुंब मर्यादा: संपूर्ण राज्यात एका कुटुंबाला केवळ एकच अतिक्रमण नियमित करता येईल.
  • मालकी हक्क: नियमित झालेली जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून दिली जाईल. ही जमीन पुढील ५ वर्षे विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही.

गायरान जमिनीबाबत विशेष नियम:

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, गायरान जमिनीवरील भूमिहीन शेतमजूर तसेच SC व ST प्रवर्गातील व्यक्तींची अतिक्रमणे थेट व्यक्तींना देण्यात येणार नाहीत. त्याऐवजी ती जमीन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला उपलब्ध करून दिली जाईल.

 अर्ज कुठे करावा?

  • ग्रामीण भाग: संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे
  • नगरपालिका क्षेत्र: मुख्याधिकारी यांच्याकडे
  • अंतिम मुदत: ३१ डिसेंबर २०२६

 आवश्यक कागदपत्रे (१ जानेवारी २०११ पूर्वीची) :

अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी किमान एक पुरावा आवश्यक आहे:

  1. मतदार यादीतील नाव किंवा वीज बिल
  2. मालमत्ता कर पावती किंवा ग्रामपंचायत नमुना ८-अ उतारा
  3. अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवहीतील नोंद किंवा सॅटेलाईट प्रतिमा

सोबत: चालू वर्षातील रहिवासाचा किमान एक शासकीय पुरावा अनिवार्य आहे.

“तालुक्यातील पात्र नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीत आवश्यक पुराव्यांसह अर्ज सादर करावेत, जेणेकरून आपल्या घराला कायदेशीर संरक्षण मिळेल.”
— विजय सवडे, तहसीलदार, चिखली

नोंद: नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वन जमीन (Forest Land) तसेच धोकादायक क्षेत्रातील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत.

Related to this topic: