Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वृध्द महिलेच्या घरात चोरी

चिंचांबाभर येथे सिरीयल चोरट्याने केला वृध्द महीलेचा खून

Elderly Woman Murder: घरामध्ये महीलेचा मृतदेह दिसुन आल्याने घटनेची माहीती रिसोड पोलिसांना दिल्यानंतर, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयामध्ये हालविण्यात आल्याची घटना रा


चिंचांबाभर येथे सिरीयल चोरट्याने केला वृध्द महीलेचा खून 

छताचे टिनपत्रे काढुन वृध्द महिलेच्या घरात चोरी

रिसोड (Elderly Woman Murder) : तालुक्यातील चिंचांबाभर येथिल द्वारकाबाई माणिकराव सानप 70 वर्षे वयोवृद्ध महिलेला पाणी भरण्यासाठी शेजारी व्यक्तीने पाणी भरण्यासाठी उठविण्यासाठी आवाज दिला. परंतु सदर महिलेच्या घराचा दरवाजा लोटला असता, घरामध्ये (Elderly Woman Murder) महीलेचा मृतदेह दिसुन आल्याने घटनेची माहीती रिसोड पोलिसांना दिल्यानंतर, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयामध्ये हालविण्यात आल्याची घटना रात्री उघडकीस आली.

चिंचाबाभर येथिल वयोवृद्ध द्वारकाबाई माणिकराव सानप (Elderly Woman Murder) वय 70 वर्षे या महिलेचा मृतदेह घरामध्ये दिसुन आल्याने गावातील एकच गळबळ उडाली,अधिक माहीती अशी की द्वारकाबाई सानप यांच्या घराच्या छतावरील टिनपत्रे काढुन घरात प्रवेश करीत चोरट्याने सदर महिलेच्या अंगावरील सोने,चांदीच्या दागीण्याची चोरी करीत सदर महिलेचा खुण केल्यी चर्चा घटनास्थळी होती. कारण मृत महिलेच्या अंगावरील सीने चांदीचे दागदागीने गायब होते. मुत महिलेच्या शरीरावर मारहाणच्या निशाण असल्याची गावा चर्चा आहे. घटनेची माहीती रिसोड पोलिसांना मिळताच घटनास्थळाचा पंचनामा शव पुढील तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात मध्ये हालविण्यात आले.घटना 17 मार्च च्या रात्री घडल्याची शक्यता स्थानिक नागरीकांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

मागील आठवड्या मध्ये रिसोड तालुक्यातील चाकोली शेतशिवारा गोठ्यावर राहणा-या दोन कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण करीत घरातील काही रक्कम चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती तर भर जहागीर येथिल सिंचन तलाव परीसरातील अनेक शेतक-यांच्या मोटार पंपाचे केबल चोरट्यांनी चोरल्याची घटना सुध्दा ताजी आहे. मागील आठवड्या मध्ये सुमारे तीन चो-या झाल्याने परीसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेचा तपास ठामेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस  तपास करित असून या प्रकरणात मर्ग दाखल करण्यात आला असून, (Elderly Woman Murder) श्वेववीच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करू, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे चोरीच्या वाढत्या घटनावर पोलिसांनी रात्र पाळीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.

चिचांबाभर मध्ये सिरीयल चोऱ्यांमुळे दहशत

गेल्या काही दिवसांपासून चिचांबाभर येथे महिलांसोबत चोऱ्यांच्या सलग घटना  घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी या गावात (Elderly Woman Murder) महिलांना लुटल्याच्या तीन घटनाघडल्या असून त्याचा तपास सुद्धा अद्याप लागला नाही चोरट्यांनी आता थेट घरांमध्ये शिरून महिलांना लक्ष करण्यास सुरुवात केली असून, नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका वृद्ध महिलेचे दागिने जबरदस्तीने लुटून तिचा खून केल्याची चर्चा होत आहे.