Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

शैक्षणिक साहित्य खरेदी सक्ती

विशिष्ट दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती थांबवा, अन्यथा आंदोलन!

Educational Material Compulsory:


विशिष्ट दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती थांबवा अन्यथा आंदोलन 

Educational Material Compulsory |

 

व्ही. एस. पँथर्स विद्यार्थी आघाडीचा शिक्षण उपसंचालकांना इशारा

लातूर (Educational Material Compulsory) : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी व पालकांना विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची शक्ती करू नये, याबाबत शिक्षण उपसंचालकांनी लक्ष घालावे व हा प्रकार तात्काळ बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेने मंगळवारी दिला. येथील व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या सूचनेनुसार विद्यार्थी आघाडीच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले.

 येत्या शैक्षणिक वर्षात लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी (Educational Material Compulsory) पालकांना विद्यार्थ्यांचे गणवेश, बूट, सॉक्स, वह्या, पुस्तके खरेदी करण्यासाठी विशिष्ट दुकानांचा आग्रह धरू नये. यामुळे पालकांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे निदर्शनास येत आहे. त्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आदेशित करावे; अन्यथा व्ही.एस. पँथर्स युवा संघटन आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल, याची गंभीरतेने दखल घेण्यात यावी, इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष असद भाई शेख, ऑटो युनियन तालुका उपाध्यक्ष विशाल गवळी, फैयाज शेख आदींच्या स्वाक्षरी आहेत.