Economic Development Corporation: राजपूत समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून महाराष्ट्र शासनाने वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ
२ जून २०२६ रोजी समाजबांधवांनी फटाके फोडून केला आनंदोत्सव; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या पाठपुराव्याचे कौतुक
चिखली (Economic Development Corporation) : राजपूत समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून महाराष्ट्र शासनाने वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयाच्या स्वागतार्थ २ जून २०२६ रोजी चिखली शहरातील हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ राजपूत समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
राज्य मंत्रिमंडळाने महामंडळाच्या (Economic Development Corporation) पदनिर्मिती प्रस्तावास मान्यता दिल्याने समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच महामंडळासाठी ५० कोटी रुपयांच्या भागभांडवलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करून राजपूत समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणाऱ्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या नावाचा जयघोष करत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख आणि नगरसेवक राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत हा निर्णय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, डॉ. प्रतापसिंह परिहार, नगरसेवक राणा सुरेंद्रसिंह ठाकूर, पत्रकार समाधान गाडेकर, डॉक्टर कृष्णा सपकाळ तालुकाध्यक्ष, बद्रीनाथ महाले, परमेश्वर सोळंकी, शिवदास राजपूत , आत्माराम इंगळे ,एडवोकेट संजय सदार ,हरिभाऊ परिहार, सिद्धेश्वर ठेंग, एकनाथ सोळंकी, परशराम सुरडकर ,गोकुळ जाधव, विनोद इंगळे, किशोर सोळंकी ,सोमेश इंगळे, नीलकंठ महाले, राहुल जाधव, विष्णू महाले ,विष्णू आव्हाळे ,शिवदास वसू श्रीकांत सोळंकी ,सहदेव सुरडकर ,संजय परिहार ,गजानन परिहार ,राहुल सोळंकी, कृष्णा सपकाळ, डॉक्टर दत्ता मोरे, प्रल्हाद गाडेकर यांच्यासह राजपूत समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे समाजाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता केली.