Parbhani Bike Accident: आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जण जखमी झाले. वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली.
परभणीतील झिरो फाटा टोलनाक्या जवळ अपघात दोघे जखमी
परभणी (Parbhani Bike Accident) : आयशरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. हि घटना शनिवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास वसमत -परभणी महामार्गावरील रस्त्यावरील झिरो फाटा टोल नाक्या जवळ घडली. याप्रकरणी आयशर चालकावर पुर्णा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील आयशर एम. एच. ०३सि.पी.७५०१ या वाहनाने एम. एच.२१ बी. बी.४३३१ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली.
या (Parbhani Bike Accident) अपघातात दुचाकीवरील मानुयल बेनदिक केरकट्टा, बिनीत निखील केरकट्टा आणि अनुप अजित होरो हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्या पैकी अनुप अजित होरो वय २३ वर्ष रा. कथकुवारी महुगाव जि.राची झारखंड याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतर दोघे जखमी असून अपघाता दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आयशर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोनि सचिन ब्रेंद्रे याच्या मागदर्शनाखाली सपोनि गजानन पाटील घटनेचा तपास करत आहेत.