Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलीस चालक शिपाई पदासाठी ५८९ उमेदवार हजर

जिल्हा पोलिस दलातील चालक पोलिस शिपाई पदाकरीता ५ एप्रिलला आदर्श महाविद्यालयावर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली.


पोलीस चालक शिपाई पदासाठी ५८९ उमेदवार हजर

Driver Constable |

६२५ उमेदवारापैकी ३६ गैरहजर

हिंगोली (Driver Constable) : जिल्हा पोलिस दलातील चालक पोलिस शिपाई पदाकरीता ५ एप्रिलला आदर्श महाविद्यालयावर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये ६२५ पैकी ५८९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. या परीक्षेला ३६ उमेदवार गैरहजर होते.

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली लेखी परीक्षा ५ एप्रिल रोजी पार पडली. हिंगोली जिल्हा पोलीस दलातील 'चालक पोलीस शिपाई' पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली असून, यासाठी स्थानिक आदर्श महाविद्यालयाचे केंद्र निश्चित करण्यात आले होते. ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करण्यात आले आहे. झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्वतः परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्यासह उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी उमेदवारांची तपासणी आणि ओळख पटवल्यानंतरच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला.

सीसीटीव्ही आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त-परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि प्रत्येक हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अंतर्गत परिसरापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तंत्रज्ञानाचा वापर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीमुळे अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात ही लेखी परीक्षा संपन्न झाली.

Related to this topic: