Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

डॉ. सतिश विडोळकर

डॉ. सतिश विडोळकर यांचा पुण्यात सपत्नीक गौरव

Dr. Satish Vidolkar: पुण्यातील घरगुती सोहळ्यात डॉ. सतिश विडोळकर यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला, ज्यांना पंजाब विधानसभेत 'भारत विभूषण' पुरस्कार मिळाला. महेश पासेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.


डॉ सतिश विडोळकर यांचा पुण्यात सपत्नीक गौरव 

Dr. Satish Vidolkar |

हिंगोली (Dr. Satish Vidolkar) : रविवार, १० मे रोजी पुण्यातील लक्ष्मीकांत पांडे यांच्या निवासस्थानी एका घरगुती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब विधानसभेत 'भारत विभूषण' या पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. सतिश विडोळकर यांचा सपत्नीक गौरव यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमात यजमान लक्ष्मीकांत पांडे यांच्या मातोश्री, ८९ वर्षीय श्रीमती शांताबाई दिवाकरराव पांडे यांच्या हस्ते डॉ. विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांचा सपत्नीक सत्कार संपन्न झाला. हा सोहळा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी महेश पासेकर, लक्ष्मण गोडसे मांगले, मेहता, अरविंद कुमुद, दिलीप नांदगांवकर, डॉ. नेहा बेलसरे, बेलसरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच पंजाब विधानसभेत मिळालेल्या 'भारत विभूषण' पुरस्काराबद्दल डॉ. सतिश विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related to this topic: